Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अपघाताने आयुष्यचं बदललं, मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; वैभव छाबरा यांचा प्रवास

Success Story of IES Vaibhav Chhabra: वैभव छाबरा यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी खूप कठीण परिस्थितीत हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

यूपीएससी (UPSC) ही सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयश येते. परंतु हे अपयश पचवून जो व्यक्ती पुन्हा सुरुवात करतो. त्याला नक्कीच यश मिळते. असंच यश वैभव छाबरा यांनी मिळवलं. वैभव छाबरा यांना एकदा दोनदा नव्हे तर ८ वेळा अपयश मिळाले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. स्वतः चे प्रयत्न सुरु ठेवले. याचं यश त्यांना मिळालं आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

सर्वसामान्य घरातून सुरुवात

वैभव छाबरा हे मूळचे दिल्लीचे आहेत. त्यांचा जन्म अगदी सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतून घेतले. त्यांच्यासाठी यूपीएससीचा अभ्यास हा खूप जास्त होता. त्यांनी कधीही अभ्यासात जास्त इंटरेस्ट नव्हता. तरीही त्यांनी प्रयत्न केले.

वैभव यांचे शिक्षण (Vaibhav Chhabra Education)

वैभव यांनी बी. टेक पूर्ण केले. त्यांनी बी.टेकमध्ये ५६ टक्के गुण मिळवले. बी.टेक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून काम सुरु केला. त्यांनी दोन वर्ष ही नोकरी केली. त्यांनंतर त्यांना या नोकरीत आनंद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आयएएस होण्याचे ठरवले.

वैभवसाठी नोकरी सोडणे हो खूप मोठा निर्णय होता. वैभव यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी बीएसएनएलमध्ये काम करण्यास सुरु केले. यादरम्यान त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपली नोकरी सोडली.

एका अपघाताने सर्व आयुष्यच बदललं

२०१८ मघ्ये वैभव यांनी यूपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला. परंतु एक दुर्घटना घडली. त्यामुळे त्यांच्या पाठीला खूप इजा झाली. यामुळे त्यांना आठ महिन्यासाठी बेड रेस्ट करायला लागला. अभ्यासाचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांनी या काळातदेखील अभ्यास सुरु केला.त्यांना २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. त्यांनी ३२वी रँक मिळवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT