Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: कोण म्हणतंय लग्नानंतर करिअरला ब्रेक लागतो? घर आणि नोकरी सांभाळत UPSC क्रॅक; IPS तनुश्रीची यशोगाथा!

Success Story Of IPS Tanushree: लग्नानंतर मुलींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. त्यांना घर आणि नोकरी सांभाळून सर्व गोष्टी कराव्या लागतात. परंतु तनुश्री यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा दिली अन् आज आयपीएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

Siddhi Hande

प्रत्येक मुलीची आयुष्यात काही स्वप्न असतात. आपल्याला चांगली नोकरी मिळावी, आपण आईवडिलांचे नाव मोठे करावे, असं वाटते. यासाठी मुली खूप प्रयत्न करतात. अनेक मुलींना स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अधिकारी व्हायचे असते. परंतु अनेकदा वय, लग्न या गोष्टींमुळे स्पर्धा परीक्षा देता येत नाही. परंतु कितीही अडचण आल्या तरीही आपण आपले प्रयत्न कायम सुरु ठेवले पाहिजे. असंच यश आयपीएस तनुश्री यांना आले आहे.

तनुश्री यांनी लग्न झाल्यानंतर यूपीएससी परिक्षेची तयारी केली आणि आज त्या आयपीएस म्हणून कार्यरत आहे. तनुश्री यांनी केंद्रिय राखीव पोलीस दलात असिस्टंट कमांडंट म्हणून करिअरची सुरुवात केली. (UPSC Success Story)

तनुश्री यांनी लग्नानंतर घर, नोकरी या जबाबदाऱ्या सांभाळून यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यानंतर त्या आयपीएस झाल्या. त्या सध्या एसआयए काश्मीर येथे कार्यरत आहेत.

तनुश्री या २०१७ च्या बॅचच्या AGMUT कॅडरच्या IPS अधिकारी आहेत. तनुश्री यांचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी झाला. त्यांनी त्यांचे शिक्षण बिहारमधील मोतिहारी येथून घेतले. त्यानंतर त्यांनी हिस्ट्री ऑनर्समध्ये बी. ए डिग्री प्राप्त केली. त्यानंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या. (IPS Success Story)

तनुश्री यांची मोठी बहीण मनुश्री या सीआरपीएफमध्ये कमांडंट आहे. मनुश्रीला पोलिसांच्या गणवेशात पाहिल्यानंतर त्यांनादेखील सरकारी अधिकारी होण्याची इच्छा झाली. त्यांचे वडिलदेखील सीआरएफमधून डीआयजी पदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यानंतर तनुश्रीदेखील सीआरएएफमध्ये भरती झाल्या.

तनुश्री यांनी प्राप्तिकर विभागाची स्पर्धा परीक्षादेखील उत्तीर्ण केली. परंतु त्या रुजब झाल्या नाहीत. त्यांनी सीआरपीएफच्या नोकरीचा प्राधान्य दिले. (Success Story Of IPS Tanushree)

असिस्टंट कमांडंट झाल्यानंतर वर्षभरात तनुश्री यांचे २०२५ साली लग्न झाले. त्यांनी लग्नानंतर आयपीएस होण्याचा निर्धार केली. कुटुंब आणि नोकरी सांभाळून त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. २०१६ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. २०१७ साली त्या IPS म्हणून रुजू झाल्या. तनुश्री या सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. त्यांचे सोशल मीडियावर खूप फॉलोवर्स आहेत. (Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT