Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

IPS Pooja Yadav: आयपीएस पूजा यादव या एक निर्भीड अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जर्मनीतील नोकरी सोडली होती.

Siddhi Hande

IPS पूजा यादव यांचा प्रवास

जर्मनीतील नोकरी सोडून दिली यूपीएससी

दुसऱ्या प्रयत्नात झाल्या आयपीएस अधिकारी

महिला या प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. मग ते बिझनेस असो किंवा प्रशासकीय सेवा. प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेक महिलांचे स्वप्न असते. परंतु त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. दरम्यान, अशीच मेहनत आयपीएस पूजा यादव यांनी केली. त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा पास केली. पूजा यादव या निर्भीड आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

पूजा यादव या मूळच्या हरियाणाच्या रहिवासी. पूजा यांचा जन्म १९८८ रोजी झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण हरियाणातून केले. त्यानंतर फूड अँड बायोटेक्नोलॉजीमध्ये एमटेक केले. यानंतर त्या परदेशात शिफ्ट झाल्या. त्यांनी जर्मनीत नोकरी केली. त्या नेहमीच लोकांची मदत करण्यासाठी पुढे असतात. त्यांची चांगल्या पगाराची नोकरी असतानाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

जर्मनीमध्ये नोकरी करत असताना त्यांनी पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात त्यांच्या कुटुंबाने त्यांची खूप साथ दिली. यूपीएससी परीक्षेचा खर्च त्यांनी स्वतः उचलला. त्यांनी यासाठी लहान मुलांचे ट्युशन घेतले. रिसेप्शन म्हणूनदेखील नोकरी केली.

यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात पूजा यांना अपयश मिळाले. परंतु तरीही त्या खचल्या नाही. त्यांनी हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. यूपीएससी परीक्षेत त्यांना १७४ रँक प्राप्त केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. परदेशातील लोखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT