Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT,IIM मधून शिक्षण, लंडनमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS दिव्या मित्तल यांचा प्रवास

Success Story of IAS Divya Mittal: आयएएस दिव्या मित्तल यांनी लंडनमधील नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली आणि आयएएस पदाला गवसणी घातली.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा देण्यासाठी खूप जिद्द आणि सातत्य गरजेचे असते.ही परीक्षा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. असंच काहीसं आयएएस दिव्या मित्तल यांनी केलं. दिव्या मित्तल यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली. दिव्या मित्तल यांनी आयआयटी, आयआयएममधून शिक्षण घेतले आणि त्यानंतर लंडनमध्ये नोकरी केली. परंतु त्यांचे स्वप्न त्यांना पूर्ण करायचे होते. त्यांनी पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससी परीक्षा दिली.

दिव्या मित्तल यांनी २०१२ मध्ये ६८ रँक प्राप्त केली. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले. दिव्या मित्तल यांचे पतीदेखील आयएएस ऑफिसर आहेत. हे दोघेही पती पत्नी लंडनमध्ये नोकरी करत होते. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. (Success Story of IAS Divya Mittal)

पती-पत्नी दोघांनीही लंडनमधील नोकरी सोडली अन् यूपीएससी परीक्षा दिली

दिव्या आणि त्यांचे पती गगनदीप यांनी परदेशातील चांगल्या पगाराची नोकरी सोडली. दिव्या मित्तल यांनी लंडनमध्ये जेपी मॉर्गन कंपनीत नोकरी करत होते. हे दोघेही परत भारतात आले. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी खूप मेहनत घेतली

आयएएस दिव्या मित्तल यांनी यूपीएससी परीक्षा पास करण्याआधी JEE परीक्षा क्रॅक केली. त्यानंतर IIT दिल्लीमधून B Tech ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी CAT परीक्षा दिली आणि IIT बंगळुरुमधून एमबीए पूर्ण केले. त्यानंतर लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

SCROLL FOR NEXT