Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: नोकरी करताना UPSC ची तयारी; तिसऱ्याच प्रयत्नात यश; IAS सर्जना यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Sarjana Yadav: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न हे करावे लागतात. कितीही अपयश आले तरी त्यावर मात करायची असते. असंच आयएएस सर्जना यादव यांनी केलं.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परिक्षेत दर वर्षी लाखो विद्यार्थी बसतात. परंतु त्यातील फक्त काहीच विद्यार्थ्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. यूपीएससी परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेकजण कोचिंग क्लासेस लावतात. परंतु कोचिंग क्लासेसशिवायदेखील यूपीएससी क्रॅक करणारे अनेक विद्यार्थी आहेत. त्यातील एक म्हणजे IAS सर्जना यादव. (Success Story)

सर्जना यादव यांनी कोचिंग क्लासेसशिवाय परीक्षा दिली.सर्जना यादव यांनी दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनिरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ट्रायमध्ये रिसर्च ऑफिसर पदावर नोकरी केली.

ट्रायमध्ये नोकरी करता करता त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परिक्षेचा अभ्यास केला.पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. तरीही संजना यांनी हार मानली नाही. (Succes Story Of IAS Sarjana)

यूपीएससी परिक्षेची तयारी करण्यासाठी संजना यांनी नोकरी सोडली. २०२९मध्ये त्यांनी यूपीएससी परिक्षेत १२६वी रँक मिळवली. आज त्या आयएएस म्हणून रुजू झाल्या आहे. त्यांनी पुस्तके, इंटरनेट, युट्यूबवरुन अभ्यास करुन हे यश मिळवले आहे.

सर्जना या सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय आहेत. त्यांचे सोशल मीडियावर २ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यांनी अनेक तरुणांना यूपीएससी परिक्षेचा अभ्यास कसा करायचा यासाठी मार्गदर्शन केले. अपयश हा शेवट नसतो तर त्यातून शिकून पुढे काहीतरी करु शकतो, असं संजना यांनी संदेश सर्वांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT