Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १३ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलं; लंडनमधील ऑफर नाकारली; चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; प्रेरणा सिंह यांची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Prerna Singh: आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती आली तरीही आपण आपले प्रयत्न कायम सुरु ठेवायला हवे. असंच काहीसं प्रेरणा सिंह यांनी केलं आहे.

Siddhi Hande

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हटलं जाते. आयुष्यात कितीही अपयश आले तरीही त्यावर मात करुन प्रयत्न करायला हवे. असंच काहीसं आयएएस प्रेरण सिंह यांनी केले. झारखंडच्या प्रेरणा सिंह यांनी खूप खडतर परिस्थितीत यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी २०२३ मध्ये ऑल इंडिया रँकमध्ये २७१ रँक मिळवली होती. (Success Story Of IAS Prerna Singh)

प्रेरणा यांना खूप वाईट प्रसंगातून गेल्या. त्यांच्या वडिलांचे खूप लहानपणीच निधन झाले. त्या फक्त १३ वर्षांच्या असताना डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आईने त्यांचे पालनपोषण केले. त्यांच्या आईने झारखंडमध्ये पशु चिकित्सा विभागात क्लर्क म्हणून काम केले. (IAS Prerna Singh)

प्रेरणा यांच्या आईने नेहमी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.प्रेरणा यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांना नेहमीच सामाजिक कार्य करायचे आहे. त्यामुळेच त्यांनी समाजशास्त्रमध्ये मास्टर्स पदवी मिळवली. त्यांनी एचआर म्हणून नोकरीदेखील सुरु केली. परंतु त्यांचे मन लागत नव्हते. शेवटी त्यांनी नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

प्रेरणा यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. पहिल्या प्रयत्नात त्यांना प्रिलियम्समध्ये २ मार्क्समुळे अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुढच्या दोन प्रयत्नातही त्यांना अपयश मिळाले. या काळात त्यांनी स्वत: आत्म निरीक्षण करुन पुन्हा प्रयत्न सुरु केले. त्यांनी आपला स्टडी प्लान तयार केला.

प्रेरणा सिंह यांचा आत्मविश्वास कमी होत होता. परंतु सीएसआरच्या एका मुलाखतीत त्यांना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी सांगण्यात आले. त्यांनी प्रेरणा सिंह यांना मोटिवेट केले. त्यानंतर त्यांनी संकल्प केला आणि यूपीएससी (UPSC) क्रॅक केली.

२०२३ मध्ये चौथ्या प्रयत्नात प्रेरणा यांनी खूप मेहनत केली. याच काळात त्यांना लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये पब्लिक पॉलिसीचा अभ्यास करण्याची ऑफर मिळाली होती. परंतु त्यांना यूपीएससी परीक्षा द्यायची होती.

२०२४ मध्ये त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. प्रेरणा सिंह यांनी यूपीएससी क्रॅक केली. त्यांच्या या यशाने सर्वांनाच प्रेरणा मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT