रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर
हर्षिता दवे यांनी क्रॅक केली लोकसेवा आयोगाची परीक्षा
दुसऱ्या प्रयत्नात मिळवली ५वी रँक
सध्या सोशल मीडियावर तरुणाई खूप जास्त सक्रिय असते. अनेकजण रिल्स बनवतात. यामुळे अनेकांना फायदा झाला आहे तर काहींनी त्याचा दुरुपयोग केला आहे. दरम्यान, अशातच काही जणांनी सोशल मीडियाचा चांगला वापर करुन खूप यश मिळवले आहे. असंच काहीसं हर्षिता दवे यांनी केलं. त्यांना सोशल मीडियावर रिल्स बनवायला खूप आवडायचे. परंतु त्यांनी सोशल मीडियाचा आपल्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.हर्षिता दवे यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली.
हर्षिता दवे या मूळच्या इंदौरच्या रहिवासी. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी मध्य प्रदेश लोक सेवा आयोगाची परीक्षा पास केली. त्यांनी फक्त परीक्षा नव्हे तर महिलांमधून टॉप केले आहे. त्यांनी एमपीपीएससी पीसीएस २०२४ परीक्षेत ५वी रँक प्राप्त केली.
हर्षिता या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी रिल्स बनवायला खूप आवडतात. त्या अनेकदा चित्रपटातील डायलॉगची मिमिक्री करतात. त्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचे सोशल मीडियावर हजारो फॉलोवर्स आहेत.
हर्षिता दवे या टॉपर विद्यार्थ्यांपैकी एक होत्या. त्यांनी शालेय शिक्षण सरस्वती शिशु मंदिर आणि माधव विद्यापीठातून केले. त्यांनी आर्ट्समधून ११वी आणि १२वीचे शिक्षण घेतले. त्यानंतर इतिहार, समाजशास्त्र विषयात बॅचलर डिग्री प्राप्त केली.
२०२३ मध्ये त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये एमए पूर्ण केले. त्यांनी अॅक्टिंगची खूप आवड होती. त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
हर्षिता यांनी त्यांच्या आजीकडून सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या आजीला प्रशासकीय सेवेत काम करायचे होते.परंतु १९६६ मध्ये त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले आणि लग्न करावे लागते.त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी हर्षिता यांनी खूप मेहनत घेतली आणि परीक्षा पास केली.
हर्षिता या रोज १२ ते १४ तास अभ्यास करायच्या. त्यांनी कोचिंग क्लासमध्ये अॅडमिशन घेतले होते. त्यांनी २०२३ मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली होती. यावेळी त्या फक्त प्रीलियम्स परीक्षा करु शकल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी अजून मेहनत घेतली. आणि परीक्षा पास केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.