Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आई-वडील मजुरी करायचे, वॉर्डन म्हणून काम करताना केली UPSC ची तयारी; पहिल्या आदिवासी IAS श्रीधन्या सुरेश यांची यशोगाथा

Success Story Of IAS Sreedhanya Suresh: आयएएस श्रीधन्या सुरेश यांनी खूप मेहनत करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्या कोलकत्त्यातील पहिल्या आदिवासी ऑफिसर आहेत.

Siddhi Hande

आयुष्यात अनेकदा खूप संकटे येतात. परंतु या संकटाशी दोन हात करुन सतत प्रयत्न करणारा व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होतो. असंच काहीसं आयएएस श्रीधन्या सुरेश यांच्यासोबत घडलं. त्या केरळच्या पहिल्या आदिवासी महिला अधिकारी आहेत.

आयएएस होणे हे खूप कठीण आहे. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. श्रीधन्या यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप साथ दिली. श्रीधन्या यांचे आई- वडील मजूर म्हणून काम करायचे.त्यांनी स्वतः खूप त्रास सहन केला मात्र मुलींच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. (Success Story Of IAS Sreedhanya Suresh)

श्रीधन्या सुरेश यांचा जन्म केरळच्या वायनाड जिल्ह्यात झाला. जेव्हा श्रीधन्या आयएएस बनल्या तेव्हा तिथे आयएएस अधिकारी आणि यूपूएससी परिक्षेची अनेकांना माहितीदेखील नव्हती. श्रीधन्या यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यांच्याकडे शिक्षणासाठी फार साधने नव्हती.त्यांना चांगला सल्ला द्यायला आजूबाजूला लोक नव्हते. तरीही श्रीधन्या सुरेश यांनी खूप मेहनत करुन यश मिळवले. (Success Story)

श्रीधन्या सुरेश यांचे आईवडिल मजूर म्हणून काम करत होते. श्रीधन्या यांनी सेंट जोसेफ कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जूलॉजीमध्ये पदव्युतर शिक्षण घेतले. त्या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या.

श्रीधन्या यांना राज्य सरकारच्या अनुसूचित जमाती विकास विभागात सरकारी नोकरी मिळाली. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात वॉर्डन म्हणून काम केले. चांगला पगार मिळूनदेखील त्यांना या नोकरीत समाधान मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी करत यूपीएससी परिक्षेची तयारी केली.

श्रीधन्या सुरेश यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांनी प्रिलियम्स आणि मुख्य परीक्षा पास केली. यूपीएससीच्या मुलाखतीसाठी दिल्लीला जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसेही नव्हते. त्या काळात त्यांच्या मित्रांनी त्यांना खूप साथ दिली. श्रीधन्या सुरेश यांनी २०१८ च्या यूपीएससी परिक्षेत ४१० वी रँक मिळवली. (Inspirational Story Of Sreedhanya Suresh)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT