Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Success Story Of IAS Pradeep Singh: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. आयएएस ऑफिसर प्रदीप सिंह यांनी नोकरी करताना यूपीएससी परिक्षेचा अभ्यास केला आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे.यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा आपल्याला अपयश मिळते. परंतु कितीही अपयश आले तरीही आयुष्यात जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तोच यशस्वी ठरतो. असंच यश प्रदीप सिंह यांना मिळालं आहे.

प्रदीप सिंह यांनी ग्रॅज्युएशननंतर कर्मचारी निवड आयोग (SSC)परीक्षा दिली. त्याचसोबत त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. त्यांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी नोकरीसोबतच अभ्यास सुरु ठेवला. (Success Story of IAS Pradeep singh)

प्रदीप सिंह हे सरकारी नोकरी करत होते. परंतु त्याचसोबत त्यांना यूपीएससी परिक्षेचा अभ्यास करणे खूप अवघड जात होते. त्यामुळे त्यांना नोकरी करताना कधीही वेळ मिळायचा तेव्हा ते यूपीएससी (UPSC) परिक्षेची तयारी करायचे. प्रदीप सिंह हे लंच ब्रेक आणि ऑफिसला येताना जाताना अभ्यास करायचे. त्यांनी त्यांच्या कामात नेहमी सातत्य ठेवले. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. २०१९ साली ते पहिली रँक मिळवत यूपीएससीचे टॉपर बनले. (UPSC Success Story)

प्रदीप सिंह हे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील एका गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील सुखबीर सिंह हे गावातील माजी सरपंच होते. त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत केले. त्यानंतर त्यांचे अॅडमिशन इंग्रजी मीडियम स्कूळमध्ये करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री प्राप्त केली.याच काळात त्यांनी एसएससी परीक्षा दिली. त्यानंतर सरकारी नोकरी सांभळत त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर बदलले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra News Live Update: पीएम मोदींच्या आव्हानानंतर शरद पवारांची पोस्ट

Maharashtra politics : राष्ट्रवादीत 'भूकंप'; पटेल-तटकऱ्यांची पदे कापली? पार्थ आणि जय पवारांची एन्ट्री, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

SCROLL FOR NEXT