Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: MBBS पास, हॉस्पिटलमध्ये १२ तासांची शिफ्ट, नंतर UPSC चा अभ्यास; दुसऱ्या प्रयत्नात IAS; अंजली गर्ग यांचा प्रवास

Success Story IAS Dr Anjali Garg: आयएएस अंजली गर्ग यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी सुरुवातीला एमबीबीएस केले त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरु केला.

Siddhi Hande

IAS अंजली गर्ग यांचा प्रेरणादायी प्रवास

MBBS पास करुन UPSC ची तयारी

दिवसा १२ तासांची शिफ्ट अन् रात्रभर अभ्यास

दुसऱ्या प्रयत्नात मिळवली ७५ रँक

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करायची असते. जोपर्यंत स्वप्न सत्यात उतरत नाही तोपर्यंत सुखाची झोप लागत नाही. दरम्यान, असंच काहीसं अंजली गर्ग यांनीदेखील केलं. त्यांनी कामासोबत यूपीएससीचा अभ्यास केला.

सर्वात कठीण परीक्षा केल्या पास

अंजली यांनी सर्वात अवघड परीक्षा पास केल्या आहेत. त्यांनी NEET पासून करुन एमबीबीएस केली. त्यांनी एमबीबीएसचा अभ्यास करता करता यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनी या काळात दिवसरात्र एक केली. शेवटी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

अंजली गर्ग यांचा जन्म १४ सप्टेंबर १९९६ रोजी चंदीगढ येथे झाला. त्यांना नेहमीच डॉक्टर व्हायचे होते. त्यांच्या कुटुंबाचा बिझनेस आहे. कोणाचाही सिविल सर्व्हिसची संबंध नाही. परंतु तरीही त्यांनी प्रशासकीय सेवेत काम करण्याचे स्वप्न पाहिले आणि पूर्ण देखील केले.

MBBS डिग्री मिळवली

अंजली यांनी १२वीत ९६ टक्के गुण मिळवले. यानंतर त्यांनी नीट परीक्षा पास केली. नीट परीक्षेनंतर त्यांना वीएमएमसी येथून एमबीबीएस केले. एमबीबीएस करताना तिसऱ्या वर्षी त्यांचा विचार बदलला. त्यांना आरोग्य व्यवस्थेत अनेक गोष्टींमध्ये हलगर्जीपणा दिसला. यामुळे त्यांनी या गोष्टी बदलण्यासाठी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

अंजली यांनी मेडिकल फील्ड सोडून सिविल सर्व्हिस जॉइन करण्याचा निर्णय घेतला. कोविडमध्ये त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले.परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी ठरल्या. त्यांना ७९ रँक मिळाली.

१२ तासांची शिफ्ट करत केला अभ्यास

यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करताना अंजली यांनी आपली इंटर्नशिप सुरु ठेवली होती. त्यांनी १२ तासांची शिफ्ट केली. यानंतर न झोपता त्या कोचिंग क्लासेसला जायच्या. त्यांनी पूर्ण वेळेचा सदुपयोग केला. त्यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UK Politics: मुस्लीम महिला होणार ब्रिटनची PM; कोणाचं नाव आहे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत?

एक मत गेमचेंजर ठरलं; ठाकरेंच्या शिलेदाराचं नशीब उजळलं, भाजपचं गणित बिघडलं

EPFO कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाय; नव्या अ‍ॅपद्वारे निघेल पीएफचा पैसा

Tuesday Horoscope : संपत्तीमध्ये वाढ होईल, दिवसभर आनंदी राहाल; ५ राशींच्या लोकांसाठी मंगळवार गेमचेंजर ठरणार

कारमध्ये डिझेल भरताना अनर्थ घडला; तरण्याताठ्या मुलाचा Heart Attackनं मृत्यू

SCROLL FOR NEXT