Stock Market 
बिझनेस

Stock Market: कटिंग चहाच्या पैशात व्हा लखपती; सात रुपयाच्या शेअरने केलं मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी

Stock Market: जानूस कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन, सुरक्षा ऑडिट, साइट व्यवस्थापन, सुरक्षिततेचे व्यवस्थापन आदी सेवा देते. या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालीय.

Bharat Jadhav

शेअर बाजारातील जानूस कॉर्पोरेशन लिमिटेडचा ​​शेअर गेल्या शुक्रवारी २० टक्क्यांनी वधारला. या शेअरला अप्पर सर्किट लागले होते आणि तो ७.१४ रुपयांवर बंद झाला. बीएसईवर कंपनीच्या शेअर्समध्ये ११ पटीहून अधिकची उसळी दिसून आली.कंपनीचे बोर्ड मेंबर ११५२०००० इक्विटी जारी करण्यासंदर्भात आणि वाटपासंदर्भात तत्त्वत: मंजुरीच्या औपचारिक स्वीकृतीवर चर्चा करण्यासाठी आणि अनुमोदनासाठी आज बैठक करणार आहेत, असं जानूस कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटलंय.

अशी शेअर्सची स्थिती

कंपनीचे मार्केट कॅप ९.५६ कोटी रुपये इतकं आहे आणि मार्च २०२४ पर्यंत कंपनी कर्ज मुक्त असल्याचं सांगितलं जात आहे. जानूस कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर गेल्या पाच दिवासांत १५.७२ टक्क्यांनी वधारलाय. महिन्याभरात हा शेअर १४ टक्के आणि सहा महिन्यात २० टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षात आतापर्यंत हा शेअर ५० टक्क्यांनी वधारला आहे. तसेच वर्षभराचा विचार करता हा शेअर एका वर्षात ८१.६८ पर्यंत वधारला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८.९५ रुपये तर नीचांक ३.६० रुपये एवढा आहे. गेल्या २०२१ मध्ये हा शेअर ५५ रुपयांवरून ८५टक्क्यांपर्यंत घसरला होता.

काय करते कंपनी

जानूस कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन, सुरक्षा ऑडिट, साइट व्यवस्थापन, सुरक्षिततेचे व्यवस्थापन, सुरक्षा दस्तऐवजीकरण आणि सुरक्षा प्रक्रियांसह बांधकाम व्यवस्थापन सल्लागार सेवा देते.

(टीप - ही केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT