ANI
बिझनेस

Share Market News: शेअर बाजार दणकून आपटला; सेन्सेक्स १०००अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले

BSE Share Market : बँकिंग शेअर्सच्या विक्रीमुळे बाजाराचा मूड बिघडला. व्यवहारात सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही २१२५० च्या खाली येत बंद झाला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी रुपये बुडाले.सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक हा ७३४२८ होता तर निफ्टी २२१२४ अंकांच्या पातळीवर होता.

Bharat Jadhav

Stock Market Crashes :

गुंतवणूकदारांसाठी मंगळवारचा दिवस काळा दिवस ठरला. आज देशातील शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसला. बाजाराची सुरुवात चांगली होत सेन्सेक्स ६०० अंकांनी मजबूत स्थितीत होता. निफ्टीही २१४००च्या अंकांवर सुरू झाला होता. पण काही वेळानंतर बँकिंग शेअर्सच्या विक्रीमुळे बाजाराचा मूड बिघडला. बाजाराचा मूड बिघडल्याने सेन्सेक्स १००० अंकांनी खाली घसरला. तर निफ्टीसुद्धा २१२५० खाली येत बंद झाला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी रुपये बुडाले. (Latest News)

सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक हा ७३४२८ होता तर निफ्टी २२१२४ च्या पातळीवर होता. शेअर बाजारात आज झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी बाजार बंद झाला तेव्हा BSE सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ३,७४,४०,५६० कोटी रुपये होते. तर आज बाजार ३,६६,३२,९४६ कोटी रुपयांवर राहिला. म्हणजेच ८ लाख कोटींहून अधिकची घट झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. बँक निफ्टीमध्ये जवळपास २.३ टक्क्यांची घसरण दिसून आली. निर्देशांकातील बहुतांश समभाग लाल निशाणीत बंद झाले. इंडसइंड बँक आणि पीएनबीचे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरले. तर एसबीआयचे शेअर ४ टक्क्यांनी घसरले. अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेत ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्याचबरोबर आर्थिक निर्देशांकही २ टक्क्यांनी कमजोर झाला आहे

एनएसईच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) सलग ४ दिवस निव्वळ विक्री करणारे राहिले. त्यांनी २० जानेवारी रोजी ५४५.५८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. FII ने जानेवारीमध्ये आतापर्यंत १३,००० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. त्याच वेळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) देखील २० जानेवारी रोजी ७१९.१३ कोटी रुपयांचे समभाग विकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT