Share Market Today Saam Tv
बिझनेस

अर्थसंकल्पाआधीच शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होण्यापूर्वीच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी तर निफ्टी 250 हून अधिक अंकांनी कोसळला असून गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) सादर होण्यापूर्वीच भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. आज बाजारात झालेल्या प्रचंड विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे. बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड झाल्याचे चित्र दिसतेय. जवळपास 80 ते १०० अंकांनी सेन्सेक्स घसरला. निफ्टी (Nifty) ५० हून अधिक अंकांनी खाली आला असून सध्या स्थिरावला आहे. दरम्यान, भारतात दुसऱ्यांदा रविवारी हा शेअर मार्केट सुरु राहिलाय. याआधी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २८ फेब्रुवारी १९९९ रोजी रविवारी हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

गुंतवणूकदारांची धाकधूक का वाढली?

गुंतवणूकदारांमध्ये सध्या 'Wait and Watch' अशी परिस्थिती आहे. अर्थसंकल्पानंतर बाजार सावरणार की ही घसरण सुरूच राहणार, याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. मध्यमवर्गीय आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी पोर्टफोलिओ लाल रंगात गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील ही घसरण तात्पुरती असू शकते. अर्थसंकल्पातील घोषणांनंतर बाजार पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईने निर्णय न घेता संयम पाळावा, असे काही तज्ज्ञांनी सांगितलेय.

शेअर मार्केट का कोसळला ?

गुंतवणूकदारांमध्ये 'कॅपिटल गेन्स टॅक्स' (Capital Gains Tax) वाढवण्याबाबत भीती होती. नवीन कर रचनेमुळे नफ्यावर परिणाम होईल या भीतीने मोठ्या प्रमाणात नफा वसुली (Profit Booking) झाली. अमेरिकन बाजार आणि आशियाई बाजारातील घसरणीचा भारतीय बाजारावर परिणाम झाला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याददर कपात न केल्यामुळे जागतिक स्तरावर सावधगिरीचे वातावरण होते. मध्य-पूर्वेतील तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $70 च्या वर गेल्या आहेत. भारत हा मोठा तेल आयातदार देश असल्याने याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे, त्याचाही परिणाम झाला आहे. त्याशिवाय सातत्याने रूपयाची किमत घसरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

SCROLL FOR NEXT