Share Market Crash Saam Tv
बिझनेस

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Share Market Crash update : शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.

Vishal Gangurde

मुंबई : शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स ९३० अंकांनी घसरून ८०,२२० वर पोहोचला आहे. तर निफ्टी ५० इंडेक्स ३१० अंकांनी म्हणजे १.२५ टक्क्यांनी घसरून २४,४७२ वर बंद झाला. निफ्टी बँक देखील ७०० अंकांनी घसरला.

बीएसई सेन्सेक्सचे टॉप ३० शेअरमधील आयसीआयसीआय बँकेचा शेअर ग्रीन झोनमध्ये होता. तर बाकीचे सर्व २९ शेअर लाल रंगात होते. शेअर बाजारातील महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये ३.२९ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, एन अँड टी, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, एसबीआयच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.

तर एनएसईच्या २,८२५ शेअरपैकी २९९ शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली. तर २,४६६ शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ६० शेअर्समध्ये कोणतेही बदल पाहायला मिळाले नाहीत. ४८ शेअर्सने ५२ आठवड्यांच्या नवा उच्चांक गाठला आहे. तर १५० शेअर्समध्ये ५२ आठवड्यांचा निचांक स्तर गाठला आहे. ४९ शेअर्समध्ये अपर सर्किट आणि ३०९ शेअर लोअर सर्किट वर आहे.

आज निफ्टी बँक ते आरोग्य क्षेत्रातील स्टॉकमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. पीएसयू बँकेत ४.४७ टक्क्यांनी घसरण दिसली. स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये घसरण पाहायला मिळाली. बीएसई स्मॉलकॅप २.१८६.१२ अंकानी घसरला. तर बीएसई मीडकॅप १,२१४.८३ अंकांनी घसरला.

कोणते १० स्टॉक घसरले?

वर्धमान होल्डिंग्सचा शेअर आज १४.२२ टक्क्यांनी घसरून ४,५४९.९० रुपयांवर बंद झाला.

जीआरएसईएचा शेअर १२.३४ टक्क्यांनी घसरून १५८१.६५ अंकावर बंद झाला.

अंबर इंटरप्राइजेज इंडियाचा शेअर ११.३१ टक्क्यांनी घसरून ५,६२७.०५ रुपयांवर बंद झाला.

जना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर ११ टक्क्यांनी घसरून ४५७.५० रुपयांवर बंद झाला.

माझगाव डॉक शिपयार्डचा शेअर १० टक्क्यांनी घसरून ४२०६ रुपयांवर बंद झाला.

सुप्रीम इंडस्ट्रीजचा शेअर १०.४८ टक्क्यांनी घसरून ४,४८५ रुपयांवर बंद झाला.

मँगलोर रिफायनरीचा शेअर ७ टक्क्यांनी घसरून १४७ रुपयांवर बंद झाला.

एसजेवीएनचा शेअर ७ टक्क्यांनी घसरला. एनएलसी इंडियाचा शेअर ६.७७ टक्क्यांनी घसरला.

पीएनबीचा शेअर ७ टक्क्यांनी घसरून ९५ रुपयांवर बंद झाला.

शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. अनेक गुंतवणूकदारांचा पोर्टपोलिओ रेड झोनमध्ये आहे. बीएसईच्या मार्केट कॅपिटलायजेशन ४,५३,६५,०२३.७४ कोटी रुपयांमधून ८.५१ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुले आता मार्केट कॅप फक्त ४,४५,१३,५०२ कोटी रुपये झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT