Central Railway Saam Tv
बिझनेस

कोल्हापूर स्पेशल! CSMT ते कोल्हापूर दरम्यानचा प्रवास होणार अतिजलद; जाणून घ्या किती असेल रेल्वे तिकीट, अन् थांबे

Mumbai to Kolhapur Railway: रक्षाबंधनासाठी रेल्वेची खास गाडी: मुंबई ते कोल्हापूर दरम्यान विशेष गाडीची घोषणा. १२ स्थानकांवर थांबा: दादर, ठाणे, पुणे, जेजुरी, लोणंद यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा.

Bhagyashree Kamble

रक्षाबंधनासाठी रेल्वेची खास गाडी: मुंबई ते कोल्हापूर दरम्यान विशेष गाडीची घोषणा.

१२ स्थानकांवर थांबा: दादर, ठाणे, पुणे, जेजुरी, लोणंद यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा.

८ ऑगस्ट रोजी प्रस्थान: रात्री 10:30 वाजता सीएसएमटीहून गाडी कोल्हापूरकडे रवाना होणार.

महिलांसाठी सोयीची सेवा: रक्षाबंधनासाठी माहेरी जाणाऱ्या महिलांना या गाडीचा फायदा होणार.

उद्या सर्वत्र रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा हा दिवस. रक्षाबंधन या सणानिमित्त अनेक जण गावी जातात. तर, काही महिला आपल्या माहेरची वाट धरतात. कामानिमित्त शहरात असणाऱ्या महिलाही या सणानिमित्त भाऊरायाकडे जातात. रक्षाबंधनानिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे ऐनवेळी आरक्षण सीट मिळत नाही. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे.

खास रक्षाबंधननिमित्ती रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते कोल्हापूर यादरम्यान स्पेशल रेल्वे चालवली जाणार आहे. ही रेल्वे मुंबई, दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजूरी, लोणंद या रूटवरून धावणार आहे.

विशेष म्हणजे या रेल्वेला राज्यातील तब्बल १२ महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देखील मंजूर करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. या रेल्वेमुळे मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आणि कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सीएसएमटी - कोल्हापूर विशेष गाडीचे वेळापत्रक

८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरच्या दिशेनं विशेष ट्रेन रवाना होणार आहे.

ही ट्रेन पुढील स्थानकांवर थांबेल:

दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद.

परतीचा प्रवास : कोल्हापूर ते सीएसएमटी

१० ऑगस्ट २०२५, दुपारी ४:४० वाजता. कोल्हापूरहून ही विशेष गाडी सीएसएमटीकडे रवाना होईल.

ही ट्रेन या स्थानकांवर थांबेल:

मिरज, सांगली, किर्लोस्कर वाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण, ठाणे, दादर.

या रेल्वेचं वैशिष्ट्ये म्हणजे एकूण १२ स्थानकांवर थांबा आहे. मिरज, सांगली, किर्लोस्कर वाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजूरी, पुणे, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादर अशा बारा स्थनकांवर थांबा घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

Liver Infection: लिव्हर इन्फेक्शन झाल्यास शरीरात 'ही' लक्षणे दिसतात, वेळीच घ्या काळजी नाहीतर...

SCROLL FOR NEXT