Business Ideas For Ladki Bahin saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो फक्त दहा हजारात सुरु करा हा व्यवसाय, महिन्याला कमवाल अफाट पैसा

Start this business in just Rs 10 thousand: या योजनेतून मिळालेल्या पैशांमधून तुम्हाला अजून पैसे कमावयचे असतील तर आम्ही तुम्हाला आज काही बिझनेस आयडिया देणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

लाडकी बहिण योजनेतून आतापर्यंत अनेक महिलांना पैसे मिळालेत आहे. या योजनेचा लाभ कदाचित तुम्हालाही मिळाला असेल. मात्र या योजनेतून मिळालेल्या पैशांमधून तुम्हाला अजून पैसे कमावयचे असतील तर आम्ही तुम्हाला आज काही बिझनेस आयडिया देणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला अशा दोन बिझनेस आयडिया देणार आहोत, ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे. या बिझनेसमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला आणखी पैसे कमावता येऊ शकतात. जाणून घेऊया असे कोणते बिझनेस आहेत, जे लाडक्या बहि‍णींना फायदेशीर ठरू शकतात.

दर महिन्याला येणाऱ्या पगारापेक्षा पैसे कमवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करणं हा एक चांगला पर्याय मानत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी पर्याय देतोय. ज्याची सुरुवात तुम्ही छोट्या गुंतवणुकीने करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 10 हजार रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल आणि तुम्ही त्यातून पैसे कमवू शकाल.

टिफीन सेवा

आजकाल अनेक मुलं आणि नोकरदार व्यक्ती घरापासून दूर राहतात. यामध्ये या व्यक्ती वेगवेगळ्या शहरात राहतात. अशा परिस्थितीत जेवण बनवण्यासाठी आणि नवीन ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं.

दररोज बाहेरचे खाण्याऐवजी टिफिन सर्व्हिसमधून जेवण ऑर्डर करणे पसंत करतात. जेणेकरून त्यांना घराबाहेर न जाता टिफिन मिळू शकेल. एका सर्वेक्षणात असं आढळून आलंय की, भारतातील लोक बाहेरील खाद्यपदार्थापेक्षा घरचं अन्न अधिक पसंत करतात. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

मोबाईल रिचार्ज दुकान

लाडक्या बहि‍णींचा लाभ अनेक गावातील महिलांनी सुद्धा घेतला असेल. तुम्ही गाव किंवा शहराजवळ राहात असाल तर तुमच्यासाठी हा कमी खर्चाचा उत्तम पर्याय असू शकतो. यासाठी तुम्हाला एक छोटेसं दुकान घ्या. यानंतर तुम्ही लोकांचा मोबाईल रिचार्ज करू शकता.

अशा काही व्यक्ती आहेत ज्या आजही रिचार्जसाठी दुकानात जातात. अशांना तुम्ही त्यांना मदत करू शकता आणि तुम्ही ते उत्पन्नाचे साधन देखील बनवू शकता. सध्या प्रत्येकाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्मार्टफोन आहे, म्हणूनच मोबाईल रिचार्ज शॉप हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

SCROLL FOR NEXT