Silver Rate Today Saam tv
बिझनेस

Silver Rate Today: सोन्यानंतर चांदीने उच्चांक गाठला! दर ३,०४,००० रुपयांवर पोहोचला; वाचा

Silver Rate Today Hike: चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चांदीचे दर प्रति किलोमागे ३ लाख ४ हजार रुपये झाले आहे. चांदीचे दर वाढल्याने खरेदीत घट झाली आहे.

Siddhi Hande

सोन्यानंतर आता चांदीचे दर वाढले

चांदीचे दर प्रति किलोमागे ३ लाख ४ हजार रुपये

चांदीच्या दरात वाढ परिणामी खरेदीत मंदी

संजय जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

सध्या लग्नसराई आणि सणासुदीचे दिवस सुरु आहेत. सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. परंतु सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना सोने विकत घेता येत नाही. मात्र,सणासुदीला सोने नाही तर चांदीची एखादी वस्तू खरेदी करतात. मात्र, आता चांदीचेही दर खूप वाढले आहेत. आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर आहेत. चांदीचे दर प्रति किलोमागे ३ लाख ४ हजार रुपये झाले आहेत.

चांदीचे दर ३ लाख ४ हजार रुपये

देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगावच्या बाजारपेठेत चांदीच्या भावाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे. चांदीचा आजचा भाव 3 लाख 4 हजार रुपये प्रति किलो आहे. चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांची संख्या 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी चांदीच्या विक्रीत मोठी मंदी पाहायला मिळत आहे.

खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत आज चांदीचा भाव उच्चांक स्तरावर पोहोचला आहे. खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीचे आजचे भाव तीन लाख चार हजार रुपये प्रति किलो झाले आहे.

अमेरिकेने लादलेले निर्बंध,टॅरिफ... इराण आणि वेनिंजुएला मध्ये असलेली अस्थिरता, व्याजदरात झालेली कमतरता यामुळे चांदी आणि सोन्याचे भाव वाढत आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की, आगामी काळात सोने-चांदीचे भाव वाढत राहतील .मात्र वाढत्या चांदीच्या भावामुळे चांदीचे 70 टक्के ग्राहक कमी झाल्यामुळे चांदीच्या बाजारपेठेत मोठी मंदी बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता रात्रभर चालणार बार; 5-स्टार हॉटेलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

Saturday Horoscope: अनावश्यक खर्च टाळा, मेहनतीचे फळ मिळेल; या ४ राशींसाठी शनिवार ठरणार लकी

Gas Cylinders : दरवाढीचा भडका उडाला! घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ, वाचा ताजे दर

घाटातून जाताना भरधाव बस रस्त्यावर उलटली; पाच महिन्याच्या बाळासह ५ प्रवाशांचा मृत्यू

धुळवडीच्या दिवशी नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतलं; आजीविरोधात पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT