Bajaj Freedom 125 CNG Saam TV
बिझनेस

Bajaj Freedom 125 CNG: बजाजची पहिली CNG बाईक खरेदी केली पाहिजे का? जाणून घ्या 5 मोठ्या गोष्टी

5 Big Things To Know About Bajaj Freedom 125 CNG Bike: तुम्हीही विचार करत असाल की फ्रीडम 125 विकत घ्यावी की नाही? तर या पाच गोष्टींवरून तुम्ही घेऊ शकता निर्णय...

Satish Kengar

बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाईक आपल्या बाय-इंधन आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्समुळे बाजारात सध्या चर्चेत आहे. या बाईकची किंमत 95,000 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक तीन प्रकारात उपलब्ध आहे. एकदा टाकी पूर्ण फुल केली की ही सुचाकी 330 किलोमीटरची रेंज देते, असा दावा कंपनीचा आहे. यातच जर तुम्ही विचार करत असाल की फ्रीडम 125 विकत घ्यावी की नाही? तर या पाच गोष्टींवरून तुम्ही घेऊ शकता निर्णय...

1. पॉवरफुल इंजिन

बजाज फ्रीडममध्ये 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 9.5 पीएस पॉवर आणि 9.7 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. 125cc मध्ये हे एकमेव इंजिन आहे, जे CNG+ पेट्रोलवर काम करते. इंजिनला अशा प्रकारे ट्यून केले गेले आहे की, ते सर्व प्रकारच्या हवामानात चांगली कामगिरी करू शकते. याच्या एक्झॉस्ट आवाजही बुलेटसारखा असून बाईकप्रेमींना तो खूप आवडतो.

2. पेट्रोलवरून CNG वर सहज होते स्विच

बजाज फ्रीडम 125 सीएनजीचे खास वैशिष्ट्य म्हणजे बाईकच्या हँडलबारच्या उजव्या बाजूला एक स्विच आहे, फक्त एका क्लिकवर तुम्ही पेट्रोलवरून सीएनजीवर स्विच करू शकता. म्हणजेच कंपनीने ही एक इझी बाईक बनवली आहे.

3. जबरदस्त फीचर्स आणि मायलेज

बजाज फ्रीडम 125 ही किफायतशीर बाईक आहे. यात 2 लीटरची इंधन टाकी आहे. ज्यामध्ये ही बाईक 130 किलोमीटर धावेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. याशिवाय बाईकमध्ये फक्त 2 किलोचा CNG सिलेंडर देण्यात आला असून तो पूर्ण टाकीवर 200 किलोमीटर धावेल, असा दावाही कंपनीने केला आहे. त्यामुळे एकूणच ही बाईक 330 किलोमीटर (CNG + पेट्रोल) पर्यंत धावेल. ही बाईक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, लॉन्ग सीट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, CNG आणि हँडलबारवरील पेट्रोल स्विच बटण, यूएसबी पोर्ट आणि गियर शिफ्ट इंडिकेटर या सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.

4. सेफ्टी फीचर्स

बजाजच्या नवीन फ्रीडम 125 सीएनजीने 11 सेफ्टी टेस्ट पास केल्या आहेत. 10 टन वजनाचा ट्रक या बाईकवरून गेल्याने या बाईकचे कोणतेही नुकसान झाले नाही, इतकेच नाही तर तिच्या सीएनजी टँकचे कोणतेही नुकसान झाले नाही. या टाकीला डाव्या आणि उजव्या बाजूला अतिशय मजबूत फ्रेम आहे. टक्कर होऊनही सीएनजी टँकची स्थिती बदलणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. तसेच सीएनजी गॅसची गळती होणार नाही, म्हणजेच ही बाईक रायडरसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. उत्तम ब्रेकिंगसाठी बाईकच्या पुढील टायरमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेक आहेत.

5. किंमत

बजाज फ्रीडम सीएनजी बाईक तीन प्रकारात उपलब्ध आहे. ही कॅरिबियन ब्लू, सायबर व्हाईट, इबोनी ब्लॅक/ग्रे आणि रेसिंग रेड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याच्या Freedom 125 Disc LED व्हेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये, Freedom 125 Drum LED व्हेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये आणि Freedom 125 Drum व्हेरिएंटची किंमत 95,000 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai Exit Poll: वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर होणार आमदार? पाहा Exit Poll

Aishwarya Rai : लेकीच्या वाढदिवसाला बापाची गैरहजेरी? ऐश्वर्याने शेअर केले आराध्याच्या वाढदिवसाचे Unseen फोटो

Khadakwasla Exit Poll : तिरंगी लढतीत कोण जिंकणार? खडकवासल्याचा एक्झिट पोल काय सांगतो?

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT