Share Market Today yandex
बिझनेस

Share Market Today : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केटचे दिवसभर हेलकावे, अखेरीला 'सपाट' बंद

Union Budget Impact on Share Market: अर्थसंकल्पात प्राप्तिकरात सूट देण्यासह अनेक मोठ्या घोषणा केल्या. शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी अपेक्षित असताना दिवसअखेर शेअर बाजार 'फ्लॅट' राहिला. त्यामुळं प्रचंड नफ्याकडं डोळे लावून बसलेला गुंतवणूकदारांची काहीशी निराशाच झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी अनेक योजना, सवलतींच्या घोषणा केल्या. सर्वात मोठी घोषणा म्हणजे १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. प्राप्तिकरात सूट देण्यासह इतरही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर बाजाराला अपेक्षित असलेली 'रॉकेट' झेप घेता आली नाही.

व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच अस्थिरतेचे झोके घेणारा निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला. जोरदार नफ्याच्या आशेने निर्देशांकाकडं डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांची काही प्रमाणात निराशा झाल्याचे दिसून आले. तसेच वैश्विक बाजारातही संमिश्र कल दिसून आला. बीसई मिडकॅप इन्डेक्स ०.४९ टक्क्यांनी घसरणीसह बंद पडले. तर स्मॅालकॅप इन्डेक्समध्ये ०.३८ टक्क्यांची वाढ दिसून आली. दिवसाखेरच्या व्यवहारानंतर कन्झ्युमर ड्युरेबल्स, रिअल इस्टेट आणि FMCG शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. तर दुसरीकडे कॅपिटल्स गुड्स, पीएसयू इन्डेक्स आणि पावर आदी शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले.

बीएसई सेन्सेक्स शेवटी सावरलाच!

अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ५.३९ अंक म्हणजेच ०.०१ टक्क्याच्या किरकोळ वाढीसह ७७,५०५.९६ अंकावर स्थिरावला. तर एनएसईचा ५० शेअर्स असलेला निर्देशांक, निफ्टी २६.२५ अंक म्हणजेच ०.११ टक्क्यांच्या पडझडीसह २३,४८२.१५ च्या पातळीवर बंद झाला.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये लिस्टेट कंपन्यांचा एकूण मार्केट कॅपिटलायजेशन आज घसरून ४२३. ७५ लाख कोटी रूपयांवर पोहोचले. जे काल म्हणजेच ३१ जानेवारी रोजी ४२४.०२ लाख कोटी रुपये होती. बीसईमध्ये आज लिस्टेट कंपन्याचे मार्केट कॅप आज सुमारे २७ हजार कोटी रूपयांनी कमी झाले. म्हणजेच गुंतवणूकदारांचे अंदाजे २७ हजार कोटी रुपये बुडाले.

विशेष म्हणजे, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-2026 सादर होत असतानाच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी कमालीची अस्थिरता अनुभवली. स्टॉक आणि कमोडिटी एक्स्चेंज, BSE, NSE आणि MCX यांनी शनिवारी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी बजेट 2025 च्या निमित्तानं एक विशेष ट्रेडिंग सेशन आयोजित केले होते.

२०८७ शेअरमध्ये तेजी

बीएसईचे बरेच शेअर वाढीसह बंद झाल्याचे चित्र आज दिसून आले. एकूण चार हजारांहून अधिक शेअरपैकी दोन हजारांहून अधिक शेअर तेजीसह बंद झाले. दुसरीकडे १८२१ शेअरमध्ये पडझड झाल्याचे पाहायला मिळाले. तर शंभरहून अधिक शेअर सपाट पातळीवर स्थिरावले.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT