Share Market, BSE Sensex/File Photo SAAM TV
बिझनेस

Share Market : शेअर बाजार उघडताच रॉकेटसारखी झेप, निफ्टीचीही दमदार ओपनिंग

Stock Market Opening Today : सोमवारी पडझडीनंतर आज स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स ४१५ अंकांनी वाढून ७१,७७० अंकांची पातळी गाठली.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

BSE Sensex Share Market today :

शेअर बाजाराची आजची सुरुवातच दमदार झाली. काल, सोमवारी पडझडीनंतर आज स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स ४१५ अंकांनी वाढून ७१,७७० अंकांच्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टीनंही जोरदार ओपनिंग केली. निफ्टी २१६५० अंकांवर पोहोचला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय शेअर बाजाराची (Share Market) सुरुवातच तेजीनं झाली. काल संध्याकाळी बाजारातील पडझडीनंतर आज स्टॉक मार्केटमध्ये उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजारात व्यवहार सुरू होताना वेगाने वाढणाऱ्या समभागांची संख्या २२०० होती. तर पडझड होणाऱ्या समभागांची संख्या अवघी २०० च्या जवळपास होती. (latest marathi news)

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE Sensex) ४१५.६९ अंक म्हणजेच ०.५८ टक्क्यांच्या उसळीबरोबरच ७१७७० अंकांच्या पातळीवर खुला झाला. तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी १४०.६० अंक म्हणजेच ०.६५ टक्क्यांच्या दमदार वाढीसह २१६५३ अंकांच्या पातळीवर खुला झाला.

भांडवली बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स ३२६.७२ अंकांच्या उसळीसह ७१६८१ पातळीवर व्यवहार करत होता. तर एनएसईचा निफ्टी १४२.५० अंकांच्या वाढीसह २१६५५ वर ट्रेड करत होता.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी पडझड

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारातील पडझडीने गुंतवणूकदारांसह सर्वांनाच मोठा धक्का दिला. निफ्टी १९७.८० अंक म्हणजेच, ०.९१ टक्क्यांनी कोसळला. तर बीएसईचा सेन्सेक्स ६७०.९३ अंकांच्या पडझडीसह ७१३५५ अंकाच्या पातळीवर बंद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

SCROLL FOR NEXT