Share Market Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण Saam tv
बिझनेस

Share Market : शेअर बाजार गलपाटला, तरीही गुंतवणूकदार मालामाल; ६२ हजार कोटी कमावले, हे ५ शेअर तेजीत

BSE Sensex : सेन्सेक्स आणि निफ्टीनं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नांगी टाकली. सेन्सेक्समध्ये ३८४ अंकांची घसरण नोंदवली. तर निफ्टीनंही कच खाल्ली.

Nandkumar Joshi

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारीच शेअर बाजार गारठला. सुरुवातच निरुत्साही झाली आणि शेवटही निरुत्साहीच राहीला. सेन्सेक्समध्ये ३८४ अंकांची घसरण नोंदवली. तर निफ्टीत घसरण होऊन तो २४,७५० अंकांच्या खाली आला. मात्र, तरीही गुंतवणूकदार मालामाल झाले. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स ०.७३ टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स ०.४३ टक्क्यांनी वाढून बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संपत्ती आज, जवळपास ६२००० कोटी रुपयांनी वाढली.

शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात निरुत्साहानं झाली असली तरी, गुंतवणूकदारांमध्ये काहीसा उत्साह दिसून आला. आता अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीतील निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. १७ आणि १८ डिसेंबरला ही बैठक होऊ घातली आहे. शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर रियल इस्टेट क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी बघायला मिळाली. तर आयटी, मेटल, ऑइल आणि गॅस आदी शेअरवर प्रचंड दबाव दिसून आला.

अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ३८४.५५ अंक म्हणजेच ०.४७ टक्क्यांच्या पडझडीसह ८१,७४८.५७ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी १००.०५ अंकांनी कमी होऊन तो २४,६६८.२५ च्या पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदार मालामाल

बीएसईमधील सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्याचा एकूण बाजार भांडवल आज १६ डिसेंबरला वाढून ४६०.०४ लाख कोटींवर पोहोचला. मागील आठवड्यात शुक्रवारी तो ४५९.४२ लाख कोटी रुपये होता. आज शेअर बाजारात पडझड दिसून आली असली तरी, बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचा मार्केट कॅप साधारणतः ६२ हजार कोटींवर पोहोचला.

५ शेअर चमकले

मीडिया रिपोर्टनुसार, शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आपटला असला तरी, बीएसई सेन्सेक्समधील ३० पैकी सहा शेअर्समध्ये 'हिरवळ' दिसून आली. इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. बजाज फायनान्स, पॉवर ग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिस बँकेचे शेअर्स तेजीसह बंद झाले. सेन्सेक्सच्या उर्वरित २४ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

डिस्क्लेमर - ही फक्त माहिती म्हणून देत आहोत. शेअर बाजारात पैसे गुंतवण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep related habits: झोपेबाबत 'ही' चूक कराल तर 172 आजार लागतील मागे; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासातून खुलासा

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Navneet Rana: किसी के हात ना आयेगी... नवनीत राणांचा भरपावसात डान्स; VIDEO

Vaishno Devi Temple : वैष्णो देवीचे दागिने चोरी; आमणापूरच्या मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

kumbha And Tula Rashi : करिअरपासून ते बिजनेसपर्यंत कसा जाणार कुंभ आणि तूळ राशीचा आजचा दिवस?

SCROLL FOR NEXT