Share Market Prediction Saam Tv
बिझनेस

Share Market Prediction: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोणते शेअर्स चमकणार? कोणत्या स्टॉक्सने तगडी कमाई होईल?जाणून घ्या

Siddhi Hande

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्थानिक शेअर मार्केटमध्ये थोडी वाढ झाली होती. शेअर मार्केटमध्ये सेनसेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला होता. एफएमसीजी (FMCG) आणि आयटी सेक्टमध्ये प्रॉफिट बुकींगमुळे फार वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या आठवड्यात युएस फेडरल रिझर्व्हच्या दर निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांना सावध भूमिका स्विकारली अन् सावधगिरीने गुंतवणूक केली. यामुळे ३० शेअर्सचा सेन्सेक्स २३.१२ अंकावर बंद झाला. ०.०३ टक्क्यांच्या वाढीसह ८१.३५५.८४ अंकावर बंद झाल्याचे पाहायला मिळाले.

काल सेनसेक्स व्यव्हारादरम्यान ५७५,७१ अंकानी वाढून ८१,९०८.४३ अंकावर पोहचला होता. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील १.२५ अंकावर म्हणजेच ०.०१ टक्क्यांच्या वाढीसह २४,८३६.१० अंकाच्या वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुर्बो कंपनीने सर्वाधिक २.७७ टक्के वाढ नोंदवली आहे. तर अल्ट्राटेक सीमेंटनेदेखील १.४२ टक्के वाढ केली आहे. बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, रिलायन्स इंड्सट्रीज आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर भारती एअरटेल, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

या शेअर्समध्ये वाढ झाली

मोमेंटम इंडिकेटर मूव्हिंग अॅव्हरेज कन्वहर्जन्स डायव्हर्जन्स नुसार, LTIMindtree, Info Edge, Apollo Hospitals Enterprise आणि Divi's Laboratoriesया शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे या शेअर्समध्ये वाढ दिसू शकते.

या कंपन्यांमध्ये मंदी दिसू शकते

MACD नुसार, बजाज स्टील इंडस्ट्रीज, जेके सिमेंट, इंडिगो पेंट्स, वेलस्पन कॉर्प, बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनच्या शेअर्समध्ये मंदी दिसू शकते.

या शेअर्समध्ये खरेदी दिसून येतेय

काल ज्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली ते शेअर्स आजही या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते. केनेस टेक्नोलॉजी (Kaynes Technology), ईआयडी पॅरी (EID Parry), 360 वन वॅम (360 One Wam), दीपक फर्टिलायझर्स, सिटी यूनियन बँक, सुमितोमो केमिकल, एफजीसी या कंपन्याच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते. या शेअर्सने ५२ आठवड्यांची उच्चांक पातळी ओलांडली आहे.

टीप - ही केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT