बिझनेस

Stock Market : कोरोनानं केलं शेअर मार्केट जाम! सेन्सेक्स ९३१ अंकांनी आपटला, गुंतवणूकदारांचे ९.३२ लाख कोटी बुडाले

Share Market News: शेअर्स बाजाराचा व्यवहार ७०५०६.३१ च्या स्तरावर बंद झाला. दिवसाअंती बीएसई सेन्सेक्स ९३०.८८ अंकांनी म्हणजेच १.३० टक्क्यांनी खाली आला. तर एनएसईच्या निफ्टी ३०२.९५ अंकांनी म्हणजेच १.४१ टक्क्यांनी घसरत २१,१५०.१५ वर बंद झाला.

Bharat Jadhav

Share Market News Sensex Down:

देशभरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. या कोरोनाचा परिणाम शेअर्स बाजारावर दिसला. विक्रमी तेजीनंतर शेअर्स बाजारात शेअर्सची जोरदार विक्री झाली. दिवसाअखेर शेअर्स बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी खाली घसल्याचं दिसून आले. बाजाराच्या शेवटी ३० शेअर्स असलेल्या बीएसई सेन्सेक्स (Sensex) ९३०.८८ अंकांनी म्हणजेच १.३० टक्क्यांनी घसरत ७०५०६.३१ च्या स्तरावर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी (Nifty) ३०२.९५ अंक म्हणजेच १.४१ टक्क्यांनी घसरत २१,१५०,१५ च्या स्तरावर बंद झाला. (Latest News)

आजच्या शेअर्स मार्केटमध्ये निफ्टीत असलेले ONGC (ओएनजीसी), Tata Consumer Products (टाटा कन्सूमर प्रोडक्ट्स) , ब्रिटानिया इंडस्ट्रीज, (Britannia Industries), Adani Ports (अदानी पोर्ट्स), Adani Enterprises (अदानी एन्टर्प्राइज )UPL (यूपीएल), Tata Steel ( टाटा स्टील )आणि Coal India (कोल इंडिया), याचे मोठे नुकसान झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीएसईमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप आज खाली येत ३४९.७९ लाख कोटी रुपयांवर आला. या कंपन्यांचा मार्केट १९ डिसेंबर रोजी ३५९.११ लाख कोटी रुपयांवर होतं. या अंकानुसार बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज तब्बल ९.३२ लाख कोटी रुपयांनी तोट्यात राहिले. अशात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये आज ९.३२ लाख कोटी रुपयांची घसरण झाली.

१९ डिसेंबर रोजी शेअर्स मार्केटमध्ये चढ-उतार पाहण्यास मिळाला होता. बीएसई सेन्सेक्स १२२.१० अंक म्हणजेच ०.१७ टक्क्यांची वाढला होता. या वाढीसह ७१,४३७.१९ अंकांवर बीएसईचा बाजार बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी ३४.४५ अंकांनी म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी तेजी राहत २१,४५३.१० अंकांवर बंद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT