Sensex Increased By 600 Saam TV
बिझनेस

Share Market Opening: निकाल लागल्यानंतर बाजार सावरला; कालच्या भुकंपानंतर सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची वाढ

Sensex Increased By 600 After Election Result | काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज बाजार थोडा सावरल्याचं दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी काही अंकांनी वाढला आहे.

Ruchika Jadhav

काल लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होताच शेअर बाजारात मोठा राजकीय भूकंप झाला. या भूकंपाने अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज बाजार थोडा सावरल्याचं दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी काही अंकांनी वाढला आहे.

सेन्सेक्समध्ये आज ६०० हून अधिक अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टी देखील २०० अंकांहून अधिक वाढला आहे. कोव्हीड काळात बाजार सर्वाधिक अंकांनी कोसळला होता. त्यानंतर आता पुन्हा 2024 लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बाजारात मोठा भूकंप पाहायाल मिळाला.

निकालाचे चित्र स्पष्ट झाले, सर्व आकडे जाहीर झाले त्यानंतर आज बाजारात पुन्हा तेजी दिसून आली आहे. काल एफआयआयने रोख आणि निर्देशांक फ्युचर्समध्ये तब्बल २२,००० कोटी रुपयांची विक्री केली आहे.

बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमधून काल ३१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ट्रिगर्समध्ये आज सकाळी गिफ्ट निफ्टी १५० अंकांची ताकदीमध्ये दिसला. तर दुसरीकडे अमेरिकन फ्युचर्स बाजारात तेजी दिसली. डाऊ फ्युचर्समध्ये ७० अंकांची तेजी आणि निक्केईमध्ये ४० अंकांची घसरण दिसली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT