Share Market Today Saam Tv
बिझनेस

Stock Market : शेअर बाजाराची ऐतिहासिक घौडदौड; पहिल्यांदा सेन्सेक्स 81000 पार, तर निफ्टीनेही घेतली उसळी, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market today News : शेअर बाजाराची ऐतिहासिक घौडदौड सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा सेन्सेक्स 81000 पार पोहोचला, तर निफ्टीनेही उसळी घेतली.

Vishal Gangurde

मुंबई : शेअर बाजाराची ऐतिहासिक घौडदौड सुरुच आहे. बीसएई सेन्सेक्सने आज गुरुवारी ६२६.९१ अंकानी उसळी घेत ८१,३४३.४६ अंकावर पोहोचला. तर एनएसई निफ्टीही १८७.८५ अंकानी उसळी घेत २४,८००.८५ अंकावर बंद झाला. शेअर बाजारात दुपारी व्यवहारात सेन्सेक्सने ७०० अंकांनी उसळी घेतली होती. त्यानंतर सेन्सेक्सने ऐतिहासिक उसळी घेतली.

इंट्रा डेमध्ये सेन्सेक्सने ८१,३८३.०७ अंकानी उसळी घेतली. निफ्टी ५० पहिल्यांदा २४,७०० पार करत २४,७४६ अंकावर पोहोचला. निफ्टी ५०ने ऐतिहासिक उच्चांक गाठला.

शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्सने उसळी घेतली. त्यानंतर पुन्हा खाली उतरला. आज गुरुवारी टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेकच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. या शेअर्सच्या तेजीदरम्यान सेन्सेक्स १६० अंकानी खाली घसरून ८०५५६ अंकावर पोहोचला. तर निफ्टीही ६५ अंकांनी घसरून २४,५४७ अंकावर व्यवहार सुरु होता.

गुरुवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास अमेरिकेच्या शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम देशातील शेअर बाजारावरही परिणाम झाला. बीसीई सेन्सेक्स २०२.३ अंकांनी घसरून ८०,५१४.२५ पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टीही ६९ अंकांनी घसरला होता. त्यानंतर या निफ्टीचा व्यवहार सुरु होता.

अमेरिकेच्या शेअर बाजारात बुधवारी देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. डिसेंबर २०२२ सालानंतर बुधवारचा दिवस सर्वात मोठी पडझड झाली. अमेरिकीतील शेअर बाजारातील पडझडीचा आशियाई देशातील शेअर बाजारांवर गुरुवारी पाहायला मिळाला. दरम्यान, बुधवारी मोहरममुळे शेअर बाजार बंद होता. दुसरीकडे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीमध्येही काही प्रमाणात तेजी पाहायला मिळाली. तर काही शेअर्समध्येच तेजी पाहायला मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT