Secondhand Car
Secondhand Car  Saam Digital
बिझनेस

Secondhand Car : सेकंडहॅन्ड वाहनांसंदर्भात मोठी बातमी; १.९२ कोटी वाहनांचं चार वर्षांनी काय होणार? जाणून घ्या

Sandeep Gawade

भारतातील सेकंड हॅन्ड म्हणजे जुन्या गाड्यांची बाजारपेठ वाढत असून वर्ष २०२८ मध्ये ही बाजारपेठ दुप्पट होईल. त्यावर्षी एक कोटी ९२ लाख जुन्या गाड्या विक्रीसाठी बाजारात येतील, अशी माहिती इंडियन ब्ल्यू बुक रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.

वोक्सवॅगनच्या कार अँड बाईक तसेच दासवेल्ट ऑटो तर्फे हा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला. किमतीचा विचार करता सध्या हा उद्योग ३१ अब्ज डॉलर पेक्षाही जास्त मूल्याचा असून वर्ष २०२८ मध्ये तो ७० अब्ज डॉलर पर्यंत जाईल, असेही अहवालात म्हटले आहे.

वोक्सवॅगन पॅसेंजर कार इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी आज येथे ही माहिती दिली. मात्र सेकंड हॅन्ड गाड्या घेतानाही ग्राहक चांगल्या दर्जाचीच मोटार घेणे पसंत करतात. जुनी मोटार घेताना ७१ टक्के ग्राहक देखभाल, दुरुस्ती खर्च हा मुख्य मुद्दा विचारात घेतात. सुरक्षेच्या मुद्द्याकडेही ग्राहक दुर्लक्ष करत नाहीत. अशा मोटारी घेताना वॉरंटी आणि वित्तसहाय्य या ग्राहकांच्या मुख्य मागण्या असतात. मात्र अजूनही जुन्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल ला ५६ टक्के ग्राहकांची पसंती नाही, असेही ते म्हणाले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता मोटर विक्रीचा कालावधी तीन दिवसांवरच आला आहे. तर विक्रेत्याला २४ तासांत पैसे हवे असतात आणि खरेदीदाराला त्याच्या सोयीच्या ठिकाणीच वाहनाची पाहणी करायची असते, असेही अहवालात म्हटले आहे. या क्षेत्रात मोठ्या कंपन्या येत असल्यामुळे स्थिरता आणि ग्राहकांना विश्वास मिळतो, असे महिंद्र फर्स्ट चॉईसचे सीईओ आणि एमडी आशुतोष पांडे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज 'या' राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा आकांक्षा होतील पूर्ण

NEET Exam Scam : नीट घोटाळ्याची कशी होती मोडस ऑपरेंडी? सावज कसं हेरायचे? इंटरेस्टिंग इनसाइड स्टोरी, VIDEO

Lok Sabha Speaker Election: कोण आहेत खासदार के. सुरेश? जे लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांना देणार आव्हान

OnePlus नंतर आता Redmiही आणणार 108MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या इतर फीचर्स

CBI Arrest Kejriwal: तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

SCROLL FOR NEXT