Bank Loan Interest Saam Tv
बिझनेस

Bank Loan Interest: कर्जावरील व्याजदर कमी होणार? जास्त व्याजदर आकारणाऱ्या बँकांना सरकारचा सल्ला, म्हणाले...

Bank Loan Interest Will Decrease: बँकेच्या कर्जावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल स्टेट बँकेच्या एका कार्यक्रमात निर्मला सितारामन यांनी बँकांना कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

Siddhi Hande

सध्या अनेकजण घर खरेदी करण्यापासून ते अगदी गाडी घेण्यासाठीही बँक लोन घेतात. परंतु सध्या बँकांचे व्याजदर खूप जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बँकांना व्याजर कमी करण्यासाठी सांगितले आहे.

केंद्र सरकारने सोमवारी सांगितले की, काही बँकांचे व्याजदर खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांनी हे व्याजदर कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी स्टेट बँकेच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. काही लोकांसाठी बँकेचे जास्त व्याजदर हे खूप तणावपूर्ण आहे. ते स्वस्त करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. (Bank Loan Interest Rate)

आर्थिक वाढ मंदावण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यातच आता अर्थमंत्र्‍यानी आश्वासन दिले आहे की, देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांची पूर्ण जाणीव आहे. विनाकारण काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

निर्मला सितारामन यांनी सांगितले की, भारताच्या वाढीची गरज पाहता कर्ज घेण्याच्या खर्चावर जास्तच दबाव असल्याचे दिसत आहे. अशा वेळी जेव्हा खर्चावर दबाव असेल. या काळात उद्योगांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बँकेचे व्याजदर स्वस्त असावेत, असं त्यांनी सांगितले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक व्यवसाय आणि आर्थिक परिषदेत बँकांना कर्ज देण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे, विमा उत्पादनाच्या चुकीच्या विक्रीमुळे कर्ज घेण्याची किंमत वाढते.

स्टेट बँक ऑफ इंडिया येत्या आर्थिक वर्षात नेटवर्क २३,००० पर्यंत नेण्याची शक्यता आहे. यासाठी ५०० नवीन शाखा उघडल्या जाणार आहेत.(State Bank Of India)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voting Center: मतदान केंद्रावर कोण कोणत्या सोयी सुविधा, आयोगानं कोणती तयारी केली?

On This Day: रोहित-विराटसह भारतीयांच्या मनात आजही सल, जिव्हारी लागणार्‍या त्या पराभवाची वर्षपूर्ती!

अमेरिकेतून आनंदाची बातमी! SpaceX ने ISRO चा GSAT-N2 उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला, पाहा व्हिडिओ

Utpanna Ekadashi: 'या' तारखेला साजरी होणार उत्पत्ती एकादशी, जाणून घ्या, महत्त्व आणि पुजा विधी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

SCROLL FOR NEXT