SBI SIP Calculation Saam Tv
बिझनेस

SBI SIP Calculation: स्टेट बँकेची नवीन SIP स्कीम! महिन्याला २५० रुपये गुंतवा ४० वर्षात मिळतील ७८ लाख; जाणून घ्या कॅलक्युलेशन

SBI Jannivesh SIP Scheme: स्टेट बँकेने नवीन जननिवेश एसआयपी स्कीम लाँच केलेली आहे. या योजनेत गुंतवणूकीवर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारी योजना, बँकेच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित आणि चांगला परतावा मिळतो. याचसोबत एसआयपीमध्ये गुंतवणूकीवर जबरदस्त परतावा सध्या मिळत आहे. SIP मध्ये दर महिन्याला कमीत कमीत पैसे गुंतवून तुम्ही चांगला फंड जमा करु शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन SIP स्कीम सुरु केली आहे.

स्टेट बँकेच्या या SIP स्कीममध्ये तुम्ही दर महिन्याला फक्त २५० रुपये गुंतवून १७ लाख रुपये मिळवू शकतात. एसबीआय म्युच्युअल फंड आणि स्टेट बँकेद्वारा ही जन निवेशन एसआयपी स्कीम सुरु केली आहे. यामध्ये तुम्ही फक्त २५० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. रोज, साप्ताहिक आणि महिन्याला गुंतवणूक करु शकतात.

या योजनेत तुम्ही कमीत कमी रुपये गुंतवून चांगला फंड मिळवू शकतात. याममध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे. यामध्ये १२ ते १६ टक्के रिटर्न मिळतात. या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला २५० रुपये एसआयपी सुरु केली. ३० वर्षांसाठी ही एसआयपी कायम ठेवली तर तुम्हाला १५ टक्के रिटर्न मिळेल. तर तुम्ही एकूण ९०,००० रुपये जमा करणार आहे. त्यावर तुम्हाला १६,६२,४५५ रुपये रिटर्न मिळणार आहे. एकूण १७.३० लाख रुपये मिळणार आहेत.

जर तुम्ही या योजनेत ४० वर्षांसाठी गुंतवणूक कराल तर तुम्हाला जवळपास ७८ लाख रुपये मिळणार आहे. यात जर तुम्ही ४० वर्षांसाठी दर महिन्याला २५० रुपये गुंतवले तर चांगला परतावा मिळणार आहे. १५ टक्के रक्कम परत मिळणार आहे. ही रक्कम चक्रव्याढ व्याजासोबत मिळणार आहे. तुम्हाला ७८,५०,९३९ रुपये मिळणार आहे. यातील व्याज कमीदेखील होऊ शकते. त्यामुळे ही रक्कम कमी होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT