SBI SIP Saam TV
बिझनेस

SBI SIP Scheme: महिन्याला २५० गुंतवा अन् १७ लाख रुपये मिळवा; SBIच्या एसआयपीने व्हाल मालामाल

SBI SIP Scheme Investment: एसआयपीमधील गुंतवणूकीवर सर्वाधिक परतावा मिळतो. जर तुम्ही एसबीआय एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला या पैशांचा उपयोग होतो. जर तुम्हालाही कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एसबीआयच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करु शकतात. एसआयपीमधील गुंतवणूक ही जोखमीची असते.परंतु काही एसआयपीमध्ये तुम्हाला परतावा मिळतो.

तुम्ही एसबीआयच्या एसआयपी स्कीममध्ये गुंतवणूक करा. यामध्ये तुम्हाला फक्त २५० रुपयांची गुंतवणूक करायची आहे. तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करुन १७ लाख रुपये मिळवू शकतात. कसं ते जाणून घ्या.

एसआयपीमध्ये गुंतवणूकीचा पर्याय (SBI Investment Scheme)

एसबीआय म्युच्युअल फंड आणि स्टेट बँकेने मिळनू जननिवेश एसआयपी स्कीम (SBI Jannivesh SIP Scheme) सुरु केली आहे. ग्रामीण, शहरी भागातील मध्यमवर्गीयांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देणे आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत तुम्ही फक्त २५० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. दरदिवशी, आठवड्याला आणि महिन्याला गुंतवणूकीचा ऑप्शन निवडू शकतात.

या योजनेत तुम्ही जर दर महिन्याला २५० रुपये गुंतवले तर १७ लाख रुपये फंड जमा करु शकतात. एसआयपीमध्ये साधारणपणे १२-१६ टक्के रिटर्न हा मिळतो. जर तुम्ही २५० रुपयांची गुंतवणूक ३० वर्षांसाठी केली आणि त्यावर १५ टक्के रिटर्न जरी धला तरी १७.३० लाख रुपये जमा होणार आहे. यामध्ये ९०,००० रुपये जमा अन् त्यावर १६,६२,४२२ रुपये रिटर्न मिळणार आहे.

जर तुम्ही या योजनेत ४० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७८ लाख रुपये मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला महिन्याला २५० रुपये गुंतवायचे आहेत. ४० वर्षानंतर १.२० लाख रुपये तुम्ही जमा कराल. यावर तुम्हाला ७७,३०,९३९ रुपये रिटर्न मिळू शकते. म्हणजेच एकूण रक्कम ही ७८ लाखांपेक्षा जास्त असेल. यामध्ये चक्रवाढ व्याजदेखील लावले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT