सर्वसामान्यांचं गृहस्वप्न महागलं
स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्जावरील व्याजदरात केली वाढ
२५ बेसिस पॉइंटने केली वाढ
कमी क्रेडिट स्कोर असलेल्या ग्राहकांना सर्वाधिक फटका
SBI Home Loan Interest Rates : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने (SBI) घराचं स्वप्न बघणाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. स्टेट बँकेने व्याजदरात २५ बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. यापूर्वी व्याजदर ७.५ ते ८.४५ टक्क्यांपर्यंत होता. आता त्यात वाढ होऊन ७.५ ते ८.७० टक्क्यांपर्यंत गेला आहे. व्याजदरात वाढ केल्याने कर्ज काढून घर घेणाऱ्यांचं स्वप्न आणखी महागणार आहे. त्यांच्यासाठी घर घेणं महाग होणार आहे.
एसबीआयच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा ज्यांचा क्रेडिट स्कोर कमी आहे त्यांना बसणार आहे. बँकेने व्याजदराची सर्वोच्च मर्यादा वाढवली आहे. त्यामुळं त्याचा परिणाम होणार आहे. एसबीआयव्यतिरिक्त युनियन बँक ऑफ इंडियानंही व्याजदरात वाढ केली आहे. तसंच आगामी काळात सार्वजनिक क्षेत्रातील सर्व वित्तीय बँका आणि संस्था व्याजदरात वाढ करू शकतात.
विशेष म्हणजे एकीकडे रिझर्व्ह बँकेकडून नियमित रेपो रेटमध्ये कपात केली जात असताना या बँकांकडून व्याजदरात वाढ करण्यात येत आहे. मागील पतधोरण आढावा बैठकीचा अपवाद वगळता यावर्षीच्या इतर बैठकांमध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली आहे.
ईटीच्या रिपोर्टनुसार, एसबीआयने CIBILL स्कोर आणि एक्स्टर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) च्या आधारे दरांमध्ये बदल केलेला आहे. कमी परतावा देणारं प्रोडक्ट असून, कमी क्रेडिट स्कोर असलेल्या ग्राहकांना नव्या कर्जावर मार्जिन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यासंबंधित क्षेत्रातील जाणकार व्यक्तीने सांगितले. नव्या ग्राहकांना हा बदल लागू होणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.