SBI RD Scheme meta ai
बिझनेस

SBI RD Scheme : SBI ची भन्नाट योजना! फक्त थोडी मासिक बचत करा आणि बना लाखपती; संपूर्ण गणित पाहा

SBI Har Ghar Lakhpati Scheme: एसबीआयची हर घर लखपती योजना ही सुरक्षित आरडी आधारित बचत योजना असून दर महिन्याला नियमित गुंतवणूक करून 3 ते 10 वर्षांत व्याजासह लाखोंचा निधी तयार करण्याची उत्तम संधी देते.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही दर महिन्याला थोडी-थोडी बचत करून भविष्यासाठी मोठा निधी तयार करण्याचा विचार करत असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची हर घर लखपती ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नियमित बचतीची सवय लावून ठरवलेल्या कालावधीनंतर एकरकमी रक्कम मिळवून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या योजनेत शेअर बाजारातल्या चढ-उताराचा कोणताही धोका निर्माण होत नाही. म्हणून सुरक्षिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेक जण याकडे पाहत आहेत.

हर घर लखपती ही योजना प्रत्यक्षात SBI च्या रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेवर आधारित आहे. या योजनेत ग्राहक दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात. निवडलेल्या कालावधीनंतर व्याजासह एकरकमी रक्कम मिळते. तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार १ लाख रुपये, २ लाख रुपये किंवा त्याहून अधिक निधी तयार करण्याचे लक्ष्यही ठरवू शकता.

SBI च्या या योजनेमध्ये ३ वर्षांपासून ते १० वर्षापर्यंतचा कालावधी निवडण्याची सुविधा आहे. कालावधी जितका जास्त असेल तितकी मासिक ठेव तुलनेने कमी असू शकते. मासिक हप्ता हा निवडलेला कालावधी आणि लागू असलेल्या व्याजदरावर अवलंबून निश्चित केला जातो.

SBI च्या या योजनेत खातं उघडण्यासाठी ग्राहक SBI YONO अॅप किंवा नेट बँकिंगच्या मदतीने ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच जवळच्या SBI शाखेत जाऊनही खातं सुरू करता येतं. अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि SBI बचत खातं महत्त्वाचं आहे.

या योजनेवर SBI आपल्या नियमित RD प्रमाणेच व्याजदर देते. सामान्य ग्राहकांना कालावधीनुसार सुमारे ६.५० टक्के ते ६.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. वरिष्ठ नागरिकांना यावर अतिरिक्त ०.५० टक्के व्याजाचा लाभ दिला जातो. व्याजाची गणना तिमाही चक्रवाढ पद्धतीने हवेत असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. जोखीम न घेता नियमित बचत करून भविष्यासाठी मोठा निधी तयार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी SBI ची 'हर घर लखपती' योजना एक चांगला आणि सुरक्षित पर्याय मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांना तीन पद्धतीनं अडकवलं जातंय; मनुस्मृतीवरून राहुल गांधींचा घणाघात

Beauty Tips : हात गोरे पण कोपर काळे? या घरगुती उपायांनी करा काळेपणा कमी

60 लाखांचं पॅकेज, 2 जुळी मुलं; इंजिनिअरच्या हत्येचं सासुरवाडी कनेक्शन आलं समोर...

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये दिवसभर वाहतूककोंडी; रात्रीही पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

Monsoon Tips : पावसाळ्यात तांदळामध्ये पडतायत किडे? 'या' ट्रिक्स करा फॉलो, मिनिटात होतील गायब

SCROLL FOR NEXT