SBI FD Intrest Rate Update Saam Tv
बिझनेस

SBI चा मोठा निर्णय! FD वरील व्याजदरात बदल; ग्राहकांना फायदा की तोटा?

SBI FD Intrest Rate Update: एसबीआयच्या ग्राहकांना एफडी करण्यापूर्वी बदललेल्या नवीन नियमांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. बँकेने एफडीवरील व्याजदरात बदल केला.

Priya More
  • एसबीआयने एफडीवरील व्याजदरात केला मोठा बदल

  • ३ कोटी रुपयांवरील एफडीचे व्याजदर केले कमी

  • एफडीवरील नवीन व्याजदर १५ ऑगस्टपासून लागू

  • ७ ते १७९ दिवसांच्या एसबीआय मोठ्या एफडीवरील व्याजदरात कपात

  • एफडी मुदतपूर्व काढल्यास किती दंड भरावा लागेल

एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही एसबीआयमध्ये एफडी काढण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला बँकेने घेतलेला महत्वाचा निर्णय माहिती असणं गरजेचा आहे. एसबीआयने ३ कोटी रुपये आणि त्यावरील देशांतर्गत मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदर काही कालावधीसाठी कमी केले आहेत. बँकेने नवीन दर १५ ऑगस्टपासून लागू केले आहेत. महत्वाचे म्हणजे व्याजदरातील हे बदल प्रामुख्याने अल्प मुदतीच्या मोठ्या एफडीवर करण्यात आले आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर होणार आहे.

एसबीायने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या सर्वसाधारण रिटेल एफडीवर हे बदल लागू केलेले नाहीत. बँकेने ७ दिवसांपासून ते १७९ दिवसांपर्यंतच्या मुदतीच्या मोठ्या एफडींवरील व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी कमी केला आहे. १८० दिवसांपासून ते २१० दिवसांपर्यंतच्या मुदतीच्या मोठ्या एफडींवरील व्याजदर १० बेसिस पॉइंट्सने म्हणजेच ०.१० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की, २११ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या मोठ्या एफडींवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

एसबीआयमध्ये दीर्घ कालावधीसाठी मोठ्या ठेवी असलेल्या ग्राहकांसाठी या मुदतींवरील व्याजदर अपरिवर्तित राहतील. एसबीआयने केलेल्या या बदलाचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांवरही झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ७ दिवस ते १७९ दिवसांच्या मुदतीच्या मोठ्या एफडीवरील व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आले आहे. तर १८० ते २१० दिवसांच्या मुदतीवरील दर १० बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला आहे. २११ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या मोठ्या एफडीवरील व्याजदरात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणताही बदल झालेला नाही. महत्वाचे म्हणजे, नियमित ठेवी असलेल्या एसबीआय एफडी म्हणजेच ३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजदर बँकेने कमी केलेले नाहीत.

एसबीआय बँकेने सांगितले की, नवीन व्याजदर नवीन एफडी आणि मुदतपूर्ती झालेल्या एफडीच्या नूतनीकरणावर लागू होतील. त्यामुळे, जर एखादा ग्राहक मुदतपूर्तीनंतर आपल्या जुन्या मोठ्या एफडीचे नूतनीकरण करणार असेल तर त्यावर लागू होणारा नवीन दर तपासणे महत्त्वाचा राहिल. एसबीआयकडून मोठ्या ठेवी मुदतपूर्व काढण्यासंबंधीचे नियमही स्पष्ट करण्यात आले आहेत. सर्व मुदतीच्या मोठ्या ठेवी मुदतपूर्व काढल्यास १ टक्का दंड आकारला जाईल. हा नियम नवीन ठेवी आणि नूतनीकरण केलेल्या एफडी या दोघांना देखील लागू असेल. त्यामुळे, एफडीमध्ये मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी ग्राहकांनी खात्री करून घ्यावी की त्यांना मधल्या काळात त्या पैशांची गरज नसेल याची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andhra Pradesh : लिफ्टमधून बाहेर पडतानाच ५२ वर्षीय महिलेचा करुण अंत; काळजाचे ठोके चुकवणारी घटना, अंगावर काटा आणणारा VIDEO

Shiv Sena SC Live : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू

Maharashtra News Live Update: महापौर आपल्या दारी; उल्हासनगरमधील नागरी समस्या सोडवण्यासाठी महापौरांच्या पुढाकाराने उपक्रम

Ticket Booking : तिकीट बुक करताना पैसे कट झाले पण तिकीट मिळाले नाही? अशा प्रकारे मिळवा रिफंड

श्रावणात आवर्जून खावी अशी चवदार आणि आरोग्यदायी चाकवताची भाजी, ही रेसिपी वाचून घरी नक्की बनवा

SCROLL FOR NEXT