SBI FD Saam Tv
बिझनेस

SBI Bank : SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँकेने व्याजदरात केली कपात; होम लोन झाले स्वस्त

sbi bank diwali offer loans come 2024: भारताच्या स्टेट बैंक ऑफ इंडियाने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एमसीएलआर मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताच्या स्टेट बैंक ऑफ इंडियाने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एमसीएलआर मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये कोणतेही नवीन बदल केलेले नाहीत. तर स्टेट बैंक ऑफ इंडियाने एमसीएलआर दर कपात केले आहेत. त्यात गृहकर्ज आणि रिटेल कर्ज यांचा समावेश होणार आहे.

स्टेट बैंक ऑफ इंडियाने एक एमसीएलआर कार्यकाळाच्या व्याज दरात २५ पॉईंट्सने कमी केली आहे. तर इतर टेन्युर दरात कोणताही बदल केलेला नाही. हा सुधारीत एमसीएलआर दर १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाला आहे. एमसीएलआर बेस्ड व्याज दरांना ८.२० टक्के ते ९.१ टक्क्यांच्या घरात समावेश करुन देणार आहे.

किती टक्क्यांनी दर कमी झाले?

ओव्हरनाईट एमसीएलआर चा दर ८.२० टक्के आहे. तर एक महिन्यासाठीचे दर ८.४५ टक्क्यांनी कमी करुन ८.२० टक्के केला आहे. त्यात २५ टक्क्यांनी बीपीएसची घसरण झाली आहे. सहा महिन्यांच्या एमसीएलआर दर ८.८५ टक्के निर्धारीत केला आहे. एक वर्षांचा एमसीएलआरला बदलून दर ८.९५ टक्के केले आहे. तर दोन वर्षांच्या एमसीएलआर दर ९.०५ टक्के आणि तीन वर्षांचा एमसीएलआर ९.१ टक्के आहे.

एमसीएलआर म्हणजे नेमकं काय?

एमसीएलआरला मार्जिनल कॉस्टऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट असे म्हटले जाते. हा असा व्याजाचा दर आहे, ज्यावर बँका आपल्या ग्राहकांना लोन देऊ शकतात. एमसीएलआर एक इंटर्नल बेंचमार्क असून त्याचा वापर बॅंक कर्ज , व्याजदर निश्चित करतात. सध्या एसबीआयचा रेट १०.४० टक्के आहे. जो १५ सप्टेंबर २०२४ पासून लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT