काही खात्यांसाठी ATM व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.
“सर्व SBI ग्राहकांना 1 ऑक्टोबरपासून ATMमधून पैसे काढण्यासाठी शुल्क”
काही खात्यांसाठी सुधारित नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी 1 ऑक्टोबरपासून एटीएम आणि रोख रक्कमेच्या व्यवहारांच्या नियमात बदल होणार आहे. या बदलामुळे 'भारतीय स्टेट बँकेने' आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिलाय. बँकेने एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत. नव्या नियमांनुसार ठरवून दिलेल्या मोफत मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
वाचक मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हा नियम बँकेच्या सर्व खातेदारांना लागू होणार नाही. हा बदल प्रामुख्याने बँकेच्या शाखांद्वारे उघडण्यात आलेल्या म्हणजेच बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खात्यांशी संबंधित ग्राहकांसाठी लागू करण्यात आलाय. 1ऑक्टोबर 2026 नंतरही BSBD खातेदारांना दरमहा ठराविक मर्यादेत मोफत पैसे काढण्याची सोय कायम राहणार आहे.
महिन्यातून एकूण 4 वेळा (एटीएम किंवा बँक शाखेतून) पैसे काढणे पूर्णपणे मोफत असणार आहे. ही मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त रोख व्यवहारावर 15 रुपये शुल्क आकारले जातील. या 15 रुपयांच्या शुल्कासोबतच ग्राहकाला लागू असणारा जीएसटी देखील अतिरिक्त भरावा लागणार आहे.
एसबीआयच्या ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या बदललेल्या नियमांचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहक आधीप्रमाणेच यूपीआय (UPI), नेट बँकिंग किंवा डिजिटल पेमेंटद्वारे कितीही वेळा मोफत व्यवहार करता येईल. त्यावर कोणतीही मर्यादा किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
बँकेने आधार सक्षम पेमेंट सिस्टीम म्हणजेच AePS द्वारे होणाऱ्या व्यवहारांच्या नियमांमध्येही मोठा बदल केलाय. आधी AePS द्वारे केलेल्या कॅश व्यवहारांना डिजिटल व्यवहार मानले जायचे आणि त्यांना 4 मोफत व्यवहारांच्या मर्यादेत धरले जात नव्हते. मात्र आता बँकेने ही सूट रद्द केलीय.
एसबीआयने ऑगस्ट महिन्यात 3 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजाचे दर 15 ऑगस्टपासून सुधारित केले होते. याशिवाय, चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) बँकेचा निव्वळ नफा 10.23% ने वाढून 21,121 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.