Amrit Vrishti Yojana Saam Tv
बिझनेस

SBI Scheme: स्टेट बँकेची ४४४ दिवसांची जबरदस्त योजना! मिळणार भरघोस परतावा

SBI Amrit Vrishti Yojana: स्टेट बँकेची ४४४ दिवसांची अमृत वृष्टी योजना खूप प्रसिद्ध आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी कालावधीत चांगला परतावा मिळतो.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. यामुळे तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक अडचण येत नाही. जर तुम्हीही तुमचे भविष्य सुरक्षित राहिल. तुम्ही कमीत कमी दिवसांमध्ये चांगले व्याजदर मिळवू शकतात. स्टेट बँकेच्या अमृत वृष्टी योजनेत भरघोस व्याज मिळते. (Amrut Vrishti Yojana)

स्टेट बँकेने अमृत वृष्टी योजना राबवली आहे. ही योजना ४४४ दिवसांची आहे. ही योजना १६ जुलै २०२४ रोजी सुरु झाली होती. या योजनेत तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात.

स्टेट बँकेची अमृत वृष्टी ही टर्म डिपॉझिट योजना आहे. या योजनेत सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज मिळते. या योजनेत भारतातील लोक आणि परदेशात राहणारे भारतीय लोकदेखील लाभ घेऊ शकतात.

अमृती वृष्टी योजना (Amrut Vrishti Yojana)

या योजनेत तुम्ही ३ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. नवीन डिपॉझिट आणि सध्याचे डिपॉझिट रिन्यू झाल्यावर हे लागू होणार आहे.टर्म डिपॉझिट आणि स्पेशल डिपॉझिटमध्ये ही योजना लागू होते.ही योजना रिकरिंग डिपॉझिट, टॅक्स सेविंग डिपॉझिट, अॅन्युटी डिपॉझिट आणि मल्टी ऑप्शन डिपॉझिटमध्ये लागू नाही होणार आहे.

या योजनेत तुम्ही कमीत कमी १,००० रुपये गुंतवू शकतात. जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला महिन्याला, तिमाही आणि छमाही आधारावर व्याजदर मिळते.

या योजनेत जर तुम्ही मुदतीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला पेनल्टी द्यावी लागणार आहे. ५ लाख गुंतवणूकीवरील पैसे काढले तर ०.५० टक्के पेनल्टी भरावी लागणार आहे. ५ लाख ते ३ कोटींपेक्षा जास्त गुंतवणूकीमधील पैसे काढले तर १ टक्के दंड भरावा लागतो. सात दिवसांमध्ये जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला व्याज द्यावे लागत नाही. स्टेट बँकेच्या स्टाफ आणि पेन्शनधारकांना पेनल्टीपासून सूट मिळते.

या योजनेत तुम्ही स्टेट बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन अर्ज करु शकतात. तसेच तुम्ही मोबाईल अॅपवरुनदेखील अर्ज करु शकतात. ४४४ दिवसांची पीरियड निवडल्यावर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT