Amrit Vrishti Yojana Saam Tv
बिझनेस

Amrit Vrishti Yojana: फक्त ४४४ दिवस गुंतवणूक करा अन भरघोस परतावा मिळवा; स्टेट बँकेची अमृत वृष्टी योजना आहे तरी काय?

SBI Amrit Vrishti Yojana: स्टेट बँक ऑफ इंडियाची ४४४ दिवसांची एफडी स्कीम आहे. अमृत वृष्टी योजनेत ग्राहकांना चांगले व्याजदर मिळते.

Siddhi Hande

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडी, योजना किंवा पॉलिसीमध्ये ग्राहक गुंतवणूक करु शकतात. एफडीमधील गुंतवणूक ही सर्वात जास्त सुरक्षित असते. तुम्हाला या गुंतवणूकीवर व्याजदर मिळते. काही ठरावीक काळानंतर तुम्हाला हे पैसे परत मिळतात. स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत वृष्टी ही चांगली योजना आहे. (Amrut Vrishti Yojana)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत वृष्टी या योजनेत चांगले व्याजदर मिळते. या योजनेत ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करायची असते. त्यामुळे कमी कालावधीत चांगले व्याजदर देणारी ही योजना आहे.

स्टेट बँकेची अमृत वृष्टी ही एफडी ४४४ दिवसांनी मॅच्युअर होते. या एफडीवर तुम्हाला ७.२५ टक्के व्याजदर मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्ती ३ कोटी रुपये तुम्ही गुंतवणूक करु शकतात. (SBI Amrut Vrishti Yojana)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. त्यामुळे ४४४ दिवसांनी म्हणजेच मॅच्युरिटीनंतर चांगला परतावा मिळणार आहे.त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँकेची अमृत वृष्टी योजना चांगला पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT