Savitri Jindal  Saam Tv
बिझनेस

Richest Women: देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? संपत्ती वाचून धक्का बसेल

Savitri Jindal Richest Women in India: हरियाणातील सावित्री जिंदल या देशातील सर्वात श्रीमंत ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती ३९.६ अब्ज डॉलर आहे.

Siddhi Hande

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर

सावित्री जिंदल या देशातील सर्वात श्रीमंत महिला

मुकेश अंबानी आणि गौतम अदानींनंतर तिसऱ्या क्रमाकांवरील श्रीमंत महिला

फोर्ब्स इंडियाने नुकतील देशातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक श्रीमंत महिला या सावित्री जिंदल आहेत. त्यांना देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून घोषित करण्यात आले. मुकेश अंबानी आणि गौतम अदानीनंतर तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत महिना या सावित्री जिंदल बनल्या आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्या ४८ व्या क्रमांकावर आहे.

सावित्री जिंदल कोण आहेत? (Who is Savitri Jindal)

सावित्री जिंदल या ओपी जिंदल ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. याचसोबत हरियाणातील हिसार येथील त्या खासदार आहेत. त्यांची संपत्ती सध्या ३९.६ अब्ज डॉलर म्हणजे ३.३ लाख कोटी रुपये आहे.

सहा महिन्यात ४.१ अब्ज डॉलरची वाढ

एप्रिल २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या यादीनुसार, सावित्री यांची संपत्ती ३५.५ अब्ज डॉलर होती. या संपत्ती फक्त सहा महिन्यात ४.१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. सहा महिन्यात त्यांच्या संपत्तीत अब्जावधींची वाढ झाली आहे. जिंदल ग्रुपचे संस्थापक ओम प्रकाश जिंदल यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या पतीचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांनी जिंदाल ग्रुपचे नेतृत्व स्विकारले.

जिंदल ग्रुप (Jindal Group)

जिंदल ग्रुप आज स्टील, वीज, सिमेट आणि पायाभूत सुविधांमध्ये आपल्या व्यवसायांचा विस्तार करत आहेत. त्यांची जेएसडब्ल्यू स्टील, जेएसडब्ल्यू सिमेंट, जेएसडब्ल्यू पेंट्स या कंपन्या आहेत. याचसोबत त्यांची वाहन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT