ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत आणि प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक आहेत.
अंबानींचे घर इतके मोठे आणि आलिशान आहे की, त्यात शंभरहून अधिक लोक राहू शकतात.
एवढ्या मोठ्या घराची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही जास्त आहे.
या कर्मचाऱ्यांना लाखो रूपयांचा पगार दिला जातो.
कोटींच्या संपत्तीचे मालक असताना देखिल ते साध्या पद्धतीचे जेवण करतात.
ज्यामध्ये चपाती, भाजी, डाळ, भात आणि सूप्स किंवा फळांचा समावेश असतो.
हे जेवण बनवण्यासाठी एक उच्च दर्जाचा शेफ हायर केला गेला आहे.
आता अंबानींचे लहान कुटुंब असताना इतक्या चपात्या कोणासाठी बनवल्या जातात, असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.
अंबानी कुटुंबाच्या आलिशान घराची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ ६०० इतकी आहे. त्यांच्यासाठी रोटी मेकरच्या सहाय्याने ४००० चपात्या बनवल्या जातात.