Samsung Galaxy M15 5G Saam Tv
बिझनेस

Samsung Galaxy M15 5G ची भारतात प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Samsung New Phone: सॅमसंग आपला नवीन हँडसेट Galaxy M15 5G लवकरच भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च करणार आहे. मात्र लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने Amazon वर या फोनची प्री-बुकिंग सुरू केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Samsung Galaxy M15 5G:

सॅमसंग आपला नवीन हँडसेट Galaxy M15 5G लवकरच भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च करणार आहे. मात्र लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने Amazon वर या फोनची प्री-बुकिंग सुरू केली आहे. तुम्हीही या फोनची वाट पाहत असाल तर तुम्ही आताच याची प्री-बुक करू शकता. यासोबतच तुम्हाला अनेक फायदेही मिळू शकतात.

कंपनी आपल्या प्री-बुकिंग ग्राहकांना या आगामी स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक फायदे देत आहे.यातच आपण याची किंमत, प्री-बुकिंगपासून ते उपलब्ध ऑफर्सपर्यंत अधिक माहिती जाणून घेऊ...  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा Samsung Galaxy फोन 8 एप्रिलला देशात लॉन्च होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. ग्राहक फक्त 999 रुपये देऊन Amazon वरून याची प्री-बुक करू शकतात. हा फोन बुक करण्यासाठी पेमेंट फक्त Amazon Pay Balance द्वारेच ग्राहक करू शकतात. (Latest Marathi News)

जर या फोनवर प्री-बुकिंगचे फायदे सांगायचे झाले तर कंपनी यासोबत 25W चा चार्जर, ज्याची किंमत 1,299 रुपये आहे, प्री-बुकिंग ग्राहकांना फक्त 299 रुपयांमध्ये देत आहे. यासोबतच ॲमेझॉन पे बॅलन्समधील प्री-बुकिंगची रक्कमही ग्राहकांना परत केली जाईल. या आगामी फोनची प्री-बुकिंग 8 एप्रिलपर्यंत सुरू आहे.

सॅमसंगच्या या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा सॅमोलेड डिस्प्ले मिळेल. ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz पर्यंत असेल. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, यात MediaTek Dimensity 6100+ चिपसेट असण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy M15 5G दोन कॉन्फिगरेशन 4GB/128GB आणि 6GB/128GB रॅम पर्यायांमध्ये येईल.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात f/1.8 अपर्चरसह 50MP प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 5MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 2MP मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी f/2.0 अपर्चरसह 13MP फ्रंट कॅमेरा यात देण्यात आला आहे. ग्राहकांना यात 6,000mAh ची बॅटरी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

SCROLL FOR NEXT