Rules Change In 1st March  Saam Tv
बिझनेस

Rules Change In 1st March : 1 मार्चपासून होणार अनेक मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rules Changes From 1st March 2024 : उद्यापासून मार्च महिना सुरु होईल. या महिन्यात अनेक नियम बदलणार आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.

कोमल दामुद्रे

What Will Change From 1st March :

उद्यापासून मार्च महिना सुरु होईल. या महिन्यात अनेक नियम बदलणार आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.

मागच्या काही काळापासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर (Budget) आणि खिशावर होणार आहे. मार्च महिन्यात बँक कर्ज, एलपीजी सिलिंडरच्या किमतीसह (Price) अनेक बदल होणार आहेत. १ मार्चपासून कोणते नियम (rules) बदलतील जाणून घेऊया.

1. जीएसटीचे नवीन नियम

केंद्र सरकार जीएसटी नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. आता ५ कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई-इनव्हॉसशिवाय ई-वे बिल तयार करता येणार नाहीये. हा नियम १ मार्चपासून लागू करण्यात येईल.

2. एलपीजी- सीएनजीच्या किमती

एलपीजी-सीएनजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला बदलतात. मागच्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाहीये. परंतु, देशात वाढणाऱ्या महागाईमुळे अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतील.

3. फास्टॅग

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)फास्टॅगचे केवायसी अपडेट करण्यासाठी २९ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत केवायसी अपडेट केले नाही तर बंद करण्यात येईल.

4. क्रेडिट कार्ड

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्रेडिट कार्डचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम १५ मार्चपासून बदलण्यात येईल. सध्या ही माहिती बँक ई-मेलद्वारे ग्राहकांना देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT