Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change: UPI ते LPG गॅस, १ मार्चपासून या नियमांमध्ये होणार मोठा बदल; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

Rule Change from 1st March: मार्च महिन्यापासून काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.

Siddhi Hande

उद्यापासून मार्च महिना सुरु होणार आहे. मार्च महिन्यात अनेक नवीन बदल होणार आहेत. या नवीन बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर खूप परीणाम होणार आहे.या नवीन नियमांमुळे सर्वासामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत ते जाणून घेऊयात.

UPI च्या नियमांमध्ये बदल

१ मार्च २०२५ पासून यूपीआय सिस्टीममध्ये विमा ASB(अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट) ही नवीन सुविधा सुरु केली जाणार आबे. यामध्ये लाइफ आणि हेल्थ इन्य़ुरन्स पॉलिसीधारक आपल्या प्रिमियम पेमेंटसाठी पहिल्यापासून पैसे ब्लॉक करु शकणार आहेत. त्यानंतर पॉलिसीधारकांच्या अप्रूवलनंतर पैसे कट होणार आहेत.

LPG चे भाव (LPG Rates)

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या भावात बदल होत असतात. १ मार्चपासून एलपीजी गॅसचे भाव वाढणार आहे. १ फेब्रुवारी २०२५ ला १९ किलोग्राम वजनाच्या सिलिंडरमध्ये ७ रुपयांची कपात करण्यात आली होती. तर घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

ATF मध्ये बदल

हवाई इंधन म्हणजेच एयर टर्बाइन फ्लूच्या किंमतीदेखील दर महिन्याला बदलतात. १ फेब्रुवारीपासून ATF च्या किंमत ५.६ टक्के वाढ करण्यात आसी होती. त्यामुळे या महिन्यातदेखील या भावांमध्ये बदल होऊ शकतो. ATF चे भाव वाढल्याने विमान प्रवास महागतो.

म्युच्युअल फंडसाठी १० नॉमिनी (Mutual Fund)

१ मार्चपासून म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. या नवीन नियमांमध्ये गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये जास्तीत जास्त १० नॉमिनी अॅड करणार आहे.या नॉमिनीला जॉइंच होल्डर्सच्या रुपात पाहिले जाते. सिंगल अकाउंट किंवा फोलियोमध्ये वेगवेगळे नॉमिनी निवडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

SCROLL FOR NEXT