RBI Money Limit Saam Tv
बिझनेस

RBI Money Limit : RBIची या बँकेवर कारवाई; पैसे काढण्यावर मर्यादा आल्याने ग्राहकांची चिंता वाढली

Reserve Bank of India News : RBI ने बँकेच्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे.

कोमल दामुद्रे

Colour Merchants Co Op Bank :

भारतीय रिझर्व्ह बँक ही इतर छोट्या आणि महत्वाच्या बँकांवर लक्ष ठेवते. वेळोवेळी ही बँक ग्राहकांसाठी महत्वाचे निर्णय घेते. ज्यावेळी RBI च्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होते तेव्हा रितसर दंड आकारला जातो.

अशातच RBI ने बँकेच्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. काही काळापूर्वी सेंट्रल बँकेने पंजाब आणि सिंध बँक, इंडियन बँक आणि एसबीआयवर दंड ठोठावला होता. बँकेची स्थिती पाहाता त्याच्या पैसे काढण्यावर लिमिट लावण्यात आली होती तर पुरेसे भांडवल नसल्यामुळे ठोस पाऊल उचलावे लागले.

1. पन्नास हजार रुपये काढता येणार

आरबीआयने (RBI) अहमदाबादस्थित कलर मर्चंट्स को-ऑप बँकेवर ही कारवाई केली आहे. ज्यामध्ये आता बँक ग्राहकांना पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम (Money) काढता येणार नाही. हे निर्बंध २६ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. तर पुढील सहा महिने ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.

2. या कामांवरही बंदी घालण्यात आली

कलर मर्चंट्स को-ऑप बँकेची आर्थिक स्थिती, पुरेसे भांडवल आणि कमाई होण्याची शक्यता नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बँक कर्ज (Loan) देऊ शकत नाही. तसेच जुन्या कर्जाचे नव्याने देता येणार नाही. तसेच बँकेत कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूकही करता येणार नाही.

3. किती दिवस बंदी असणार?

याबाबतचा निर्णय बँक ग्राहक अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ शकते. आरबीआयने सांगितले की, बँकेचा परवाना रद्द झाला नाही. जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही. तोपर्यंत ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT