बिझनेस

Renault Triber: 7 सीटर कार मार्केट गाजवणार, येणार सर्वात स्वस्त फॅमिली कार

7 Seater Car: रेनॉल्ट ट्रायबरच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये ७-सीटर लेआउट कायम ठेवण्यात आला असून तिसऱ्या रांगेतील सीटला हेडरेस्ट देण्यात आला आहे. याआधी सीएनजी व्हर्जनही सादर झाले.

Dhanshri Shintre

भारतीय बाजारात किफायतशीर ७-सीटर कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ही मोठी बातमी आहे. रेनॉल्ट ट्रायबरचा फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच दाखल होणार असून, तो नवीन आकर्षक लूक आणि फिचर्ससह येईल. सध्या ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत ६.१५ लाखांपासून ८.९८ लाख रुपयांपर्यंत आहे. नव्या मॉडेलची किंमतही या किंमत श्रेणीतच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

२०१९ मध्ये लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच रेनॉल्ट ट्रायबरला अपडेट दिलं जाणार आहे. चाचणी दरम्यान ही कार पुन्हा चेन्नईजवळ पाहायला मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या फेसलिफ्टमध्ये बाह्य आणि आंतरराष्ट्रीय डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे. जाणून घ्या, काय असणार आहेत या अपडेटेड मॉडेलची खासियत.

रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्टमध्ये सुधारित हेडलॅम्प क्लस्टर, एलईडी डीआरएल्ससह नवीन आयब्रो आणि नव्या डिझाइनची फ्रंट ग्रिल दिसणार आहे. मागील प्रोफाइलमध्येही बदल झाले आहेत. अद्याप इंटीरियर फोटो समोर आले नाहीत, मात्र रिपोर्टनुसार, नवीन फीचर्स आणि हलक्या रंगातील सॉफ्ट टच मटेरियल डॅशबोर्डवर दिसणार आहे. सध्याचे मॉडेल १.० लिटर पेट्रोल इंजिनसह ७२bhp पॉवर देते.

खास गोष्टी कोणत्या आहेत का?

- रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्टमध्ये ७-सीटर लेआउट कायम ठेवण्यात आला आहे.

- तिसऱ्या रांगेतील सीटला आता हेडरेस्ट देण्यात आले आहे.

- ज्यामुळे प्रवाशांना जास्त आराम मिळेल. काही काळापूर्वी कंपनीने ट्रायबरचे सीएनजी व्हर्जन सादर केले होते.

- भारतात मोठ्या, उपयुक्त आणि बजेटमध्ये बसणाऱ्या कारची मागणी वाढताना दिसत आहे.

- ट्रायबर मारुती स्विफ्ट आय२०, टिगोर, डिझायरसारख्या गाड्यांना टक्कर देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT