KWID RXE Car Saam Tv
बिझनेस

KWID RXE Car : कारचं स्वप्न होईल पूर्ण, फक्त ९ हजाराच्या हप्त्यात घरी आणा तुमची स्वत:ची कार

Car Finance Plan: बर्‍याच काळानंतर Renault कंपनीने नवीन अपडेट्ससह नवीन कार बाजारात लॉन्च केली आहे. ज्या लोकांचं कार घेण्याचं स्वप्न आहे. त्यांच्यासाठी कंपनीने एक विशेष ऑफर ठेवलीय. खिशात फक्त ५१ हजार रुपये जरी असले तरी तुम्ही कारचे मालक होऊ शकतात.

Bharat Jadhav

Renault India KWID RXE Car:

Renault India ने भारतीय बाजारात नवीन कार लॉन्च केलीय. या कारचे फीचर्स आणि किंमत वाचून तुम्ही हातातील काम सोडून थेट कार घेण्यासाठी शोरुमच्या बाहेर रांग लावाल. ज्या लोकांना कार घेण्याचं स्वप्न आहे, अशा लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्विड कंपनीने एक खास ऑफर आणलीय. काय ऑफर आहे हे आपण जाणून घेऊ... (Latest News)

तुम्‍ही कमी बजेटमध्‍ये नवीन हॅचबॅक खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर विलंब करू नका. रेनॉल्ट कंपनी अगदी कमी किंमतीत ही हॅचबॅक कार खरेदी करण्‍यासाठी अतिशय सोप्या आणि बजेट फ्रेंडली फायनान्‍स प्‍लॅन घेऊन आलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) अपडेटेड एडिशनच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत ४,६९,५०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ऑन-रोडनंतर ही किंमत ५,१२,६३२ रुपये होईल. जर तुम्ही ते कॅश पेमेंटद्वारे विकत घेत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे ५.१२ लाख रुपये असावावे लागतील. जर तुमच्याकडे रोख पेमेंटद्वारे खरेदी करण्याचे बजेट नसेल, तरीही तुम्ही कारचे मालक होऊ शकतात. यासाठी तुम्हाला फक्त ५१ हजार रुपये भरावे लागतील.

जर तुमचे बजेट ५१ हजार रुपये असेल तर या आधारावर बँकेकडून तुम्हाला ४,६१,६३२ रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के व्याजदर लागेल. Renault KWID साठी कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ५१,००० रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल. त्यानंतर बँक तुम्हाला वाहन कर्ज देईल. हे कर्ज निश्चित कालावधी (५ वर्षे) असेल. या पाच वर्षात तुम्हाला गाडीचा हप्ता म्हणून दरमहा ९,७६३ रुपये बँकेत जमा करावे लागतील.

काय मग आहे ना, स्वस्त आणि मस्त कार. थांबा लगेच घाई करू नका शोरुमला जाण्याची. या कारचे फीचर्स जाणून. कारचे फीचर्स वाचून तुम्ही विचार करणार नाहीत तर थेट कार घरी आणाल. Renault Kwid ला उर्जा देणारे इंजिन ९९९ cc आहे, जे ५५०० rpm वर ६७.०६ bhp ची पॉवर आणि ४२५ rpm वर ९१ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर्स देण्यात आलेत. ही कार २१.४६ किलोमीटर प्रति लिटर इतकं मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT