Mukesh Ambani On Jio Air Fiber Saam Tv
बिझनेस

Jio Air Fiber: 'जिओ एअर फायबर'ची प्रतीक्षा संपली, गणेश चतुर्थीला होणार लॉन्च; मुकेश अंबानींनी केली घोषणा

Reliance AGM: 'जिओ एअर फायबर'ची प्रतीक्षा संपली, गणेश चतुर्थीला होणार लॉन्च; मुकेश अंबानींनी केली घोषणा

Satish Kengar

Jio Air Fiber News: जिओ एअर फायबरची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ एअर फायबर गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याची घोषणा केली.

Jio Air Fiber, 5G नेटवर्क आणि सर्वोत्तम वायरलेस तंत्रज्ञान वापरून ते घर आणि ऑफिसेसला वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवेल. दूरसंचार क्षेत्रात जिओ एअर फायबरच्या आगमनाने अनेक बदल पाहायला मिळतील.

मिळणार जबरदस्त कनेक्टिव्हिटी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, ''1 कोटीहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी, जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो परिसर आहेत जिथे वायर जोडणे अवघड आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करेल. याद्वारे आम्ही 20 कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची आमची अपेक्षा आहे. Jio Air Fibe सादर केल्यामुळे, Jio दररोज 1.5 लाख नवीन ग्राहक जोडू शकेल.''   (Latest Marathi News)

जिओचे ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतात 15 लाख किमी परिसरात पसरलेले आहे. सरासरी ऑप्टिकल फायबरचा ग्राहक दरमहा 280 GB पेक्षा जास्त डेटा वापरतो, जो Jio च्या दरडोई मोबाईल डेटा वापराच्या 10 पट आहे. एजीएममध्ये Jio Air Fiber सोबतच 'Jio True 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म' आणि 'Jio True 5G लॅब' लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली.

जिओ एअर फायबर लॉन्चची घोषणा करताना मुकेश अंबानी म्हणाले, “आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. जे भारतीय उद्योग, छोटे व्यवसाय आणि तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सचा डिजिटल जगाशी संवाद साधण्याचा मार्ग बदलेल. एंटरप्राइझच्या गरजा लक्षात घेऊन, जिओने 5G नेटवर्क, एज कंप्युटिंग आणि अॅप्लिकेशन्स एकत्र करून एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT