Jio VS Airtel Recharge canva
बिझनेस

Reliance Jio Vs Airtel: न्यू इअर धमाका! जिओ- एअरटेलचे नवीन जबरदस्त रिचार्ज प्लान, कोण देणार सर्वाधिक फायदा?

Reliance Jio And Airtel Recharge Plan: रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी खास करून न्यू इअरसाठी हा रिचार्ज प्लान आणला आहे. याचे फायदे काय -काय असणार आहेत ते घ्या जाणून...

Priya More

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी आहेत. या कंपनींच्या रिचार्ज प्लान्सला युजर्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. आपल्या युजर्ससाठी या कंपन्या देखील नवनवीन सर्वात स्वस्त प्लान्स आणत असतात. नुकताच या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या नव्या रिचार्ज प्लान्सचा युजर्सला खूप चांगला फायदा होणार आहे. जिओ आणि एअरटेलचे हे प्लान कोणते आहेत आणि याचा काय फायदा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी खास करून न्यू इअरसाठी हा रिचार्ज प्लान आणला आहे. रिलायन्स जिओ कंपनीने २०२५ रुपये असलेला प्रीपेड प्लान नुकताच लाँच केले आहे. तर एअरटेल कंपनीने ३९८ रुपयांचा प्लान लाँच केला आहे. रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये कोणत्याही प्रकारचे ओटीटी बेनिफिट्स मिळणार नाही. तर एअरटेलच्या प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

रिलायन्स जिओच्या २०२५ रुपयेवाल्या प्रीपेड प्लानमध्ये २.५ जीबी प्रत्येक दिवशी ऑफर मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड ५ जी डेटा देखील मिळतो. ग्राहक या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग ही सुविधा देखील मिळते. या प्लानमध्ये १०० एसएमएसची सुविधा प्रत्येक दिवसाला मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडिटी २०० दिवसांची आहे.

रिलायन्स जिओ कंपनी भागीदार कंपन्यांसोबत भागीदारीत अतिरिक्त फायदे देखील देत आहे. या रिचार्ज प्लॅनसह, ग्राहकांना ५०० रुपयांचे AJIO डिस्काउंट कूपन मिळेल. यासोबतच स्विगीकडून १५० रुपयांचे डिस्काउंट कूपनही दिले जात आहे. वापरकर्ते प्लॅनसह १५०० रुपयांचे Ease My Trip डिस्काउंट कूपन देखील मिळवू शकतात. या प्लानमध्ये मिळणारे अतिरिक्त फायदे ११ डिसेंबर २०२४ ते ११ जानेवरी २०२५ पर्यंत मिळतील. हा रिलायन्स जिओद्वारे लाँन्च करण्यात आलेला न्यू इअर ऑफर आहे.

तर दुसरीकडे, एअरटेलच्या ३९८ रुपयांचा प्लान युजर्सला अनलिमिटेड ५ जी नेटवर्क ऑफर करते. या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, १०० एसएमएस सुविधा मिळते. या प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. जर तुम्हाला हॉटस्टार प्लान पाहिजे असेल तर त्यासाठी १४९ रुपये मोजावे लागत होते. पण एअरटेलचा हा प्लान घेतला तर तुम्हाला हॉटस्टार फ्रीमध्ये मिळेल. हा प्लान तुमच्यासाठी एक परफेक्ट प्लान असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT