Reliance Diwali Offer  Saam Tv
बिझनेस

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Reliance Offer News : रिलायन्स डिजिटलतर्फे दिवाळीनिमित्त ‘फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’ अंतर्गत आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना ३० हजारांपर्यंत विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर प्रचंड सवलती मिळणार आहेत. ही ऑफर २६ ऑक्टोबरपर्यंतच उपलब्ध आहे.

Alisha Khedekar

रिलायन्स डिजिटलतर्फे ‘फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’ अंतर्गत दिवाळी ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत

ग्राहकांना २० हजारांपर्यंत सूट आणि ३० हजारांपर्यंत कॅशबॅकची संधी

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठ्या सवलती आणि मोफत गिफ्ट्स उपलब्ध आहेत

ऑफर फक्त २६ ऑक्टोबरपर्यंत रिलायन्स डिजिटल आणि जिओमार्ट स्टोअर्समध्ये उपलब्ध

दिवाळीनिमित्त रिलायन्स डिजिटलतर्फे खास ऑफर! रिलायन्सतर्फे ‘फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’ या आकर्षक ऑफर्ससह स्मार्ट बचतीची संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ऑफर केवळ येत्या २६ तारखेपर्यंत उपलब्ध असणार आहे. ही ऑफर काही ठराविक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटी कमी झाल्यामुळे बँक कार्ड्सद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना २० हजारांपर्यंत सूट मिळत असून, या ऑफर्स रिलायन्स डिजिटल, माय जिओ, जिओमार्ट डिजिटल स्टोअर्स आणि रिलायन्स डिजिटलच्या संकेत स्थळावर रविवारपर्यंत उपलब्ध आहेत. याशिवाय, पेपर फायनान्सद्वारे ३० हजारांपर्यंत कॅशबॅकची संधीही आहे.

स्वयंपाकघरातील उपकरणांवर ५ ते १५ टक्के सूट, तसेच फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर ६२,९९० रुपयांपासून सुरू आणि साइड बाय साइड रेफ्रिजरेटर ४४,९९०पासून असून, प्रत्येक खरेदीवर ९००० रुपयांपर्यंत असलेली कोणतीही उपयुक्त वस्तू मोफत मिळत आहे. ४९,९९० रुपयांपासून स्मार्ट वॉशर-ड्राय, स्मार्ट एआय ऑल-इन-वन वॉशर ४९,९९०पासून सुरू होणार आहे. ते खरेदी केल्यावर ७५०० पर्यंतच्या मोफत भेट वस्तू मिळणार आहे.

१७,९९० रुपयांपासून स्प्लिट एसीसारख्या आकर्षक स्कीम्सचा समावेश आहे. यासह विशेष ऑफर्समध्ये टीसीएल ८५ इंच क्यूएलइडी टीव्ही १,१९,९९० रुपयांमध्ये दोन वर्षांच्या वॉरंटीसह, ७९,९९९ मध्ये लेनेवो आयडिया पॅड ५ एआय लॅपटॉपसोबत ५५ इंच टीव्ही मोफत मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket Discount News: प्रवाशांसाठी गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर मिळणार ३ टक्के सूट; वाचा काय आहे 'ही'योजना?

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

Bollywood Movies 2026: 'बॅटल ऑफ गलवान' ते 'धुरंधर २'; २०२६मध्ये प्रदर्शित होणार बॉलिवूडचे हे मोठे चित्रपट

Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

BMC Election 2026: अखेरच्या क्षणी वंचितकडून काँग्रेसला दणका, १६ वॉर्डमध्ये उमेदवारच नाही; इच्छुकांचा संताप

SCROLL FOR NEXT