Redmi Watch 5 Active SAAM TV
बिझनेस

ब्लूटूथ कॉलिंग अन् १८ दिवसांची बॅटरी लाइफसह Redmi Watch 5 Active स्मार्टवॉच लाँच; किंमत किती?

Redmi Watch 5 Active : बाजारात स्वस्तात मस्त रेडमीने स्मार्टवॉच लाँच केले आहे. पावरफुल बॅटरीसह हाय लेव्हल ब्लूटूथ कॉलिंगसारखे फीचर्स देखील यात आहे. याची किंमत जाणून घ्या.

Shreya Maskar

स्मार्टफोन उत्पादक कंपनी Xiaomi चा सब-ब्रँड असलेल्या Redmi ने भारतीय बाजारात नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. रेडमी वॉच 5 ॲक्टिव्ह (Redmi Watch 5 Active ) स्मार्टवॉचमध्ये, कंपनीने पावरफुल बॅटरी लाइफसह ब्लूटूथ कॉलिंग सारखे भन्नाट फीचर्स दिले आहेत. या स्मार्टवॉचचे डिझाईनही खूपच स्टायलिश आहे जे तरुणांना आकर्षित करत आहे.

Redmi Watch 5 Active चे फीचर्स

  • 2-इंचाचा LCD डिस्प्ले - हा डिस्प्ले 500 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

  • पावरफुल 70mAh बॅटरी - ही बॅटरी मॅग्नेटिक चार्जिंगलाही सपोर्ट करते.

  • 18 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप

  • नवीन स्मार्टवॉचचा पट्टा TPU मटेरियलपासून बनवला आहे.

  • स्मार्टवॉच हायपरओएस सॉफ्टवेअरवर आधारित आहे.

  • 200+ क्लाउड वॉच फेस

  • स्मार्टवॉचमध्ये हिंदी भाषा सपोर्ट, इमोजी सपोर्ट आहे.

  • कस्टमाइझ रिंगटोन

  • Mi Fitness App देखील यात आहे.

  • IPX8 रेटिंगसह लाँच करण्यात आले आहे.

  • 140 हून अधिक स्पोर्ट्स मोड

  • क्लिअर कॉलिंगसाठी स्मार्टवॉचमध्ये तीन माइकसह ENC सेटअप दिला आहे.

  • स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर, एक्सेलेरोमीटर आणि SpO2 सेन्सर देखील प्रदान करण्यात आला आहे.

  • फिमेल हेल्थ ट्रॅकिंग, स्टेप्स काउंटर फिचर्स

किंमत किती?

कंपनीने हे स्मार्टवॉच 3 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात आणले आहे.कंपनीने Redmi Watch 5 Active भारतात 2799 रुपयांच्या किमतीत लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये मॅट सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लॅक सारख्या रंग उपलब्ध आहेत. मात्र याची विक्री ३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ऑनलाइन तुम्हाला हे स्मार्टवॉच खरेदी करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT