RBI Repo Rate Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate : नव्या वर्षात EMI कमी होणार, RBI पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, वाचा अपडेट

RBI Repo Rate May Cut: रिझर्व्ह बँक ऑउ इंडिया महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करु शकते. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकीत निर्णय होऊ शकतो.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक फेब्रुवारीमध्ये मोठा निर्णय घेणार

रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता

कर्जाचा हप्ता होणार कमी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची दर दोन महिन्याला पतधोरण बैठक असते. या बैठकीत पैशासंबंधित अनेक निर्णय घेतले जातात. दरम्यान, रिझर्व्ह बँकेची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पतधोरण बैठक झाली आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात झाली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट कमी होणार

रिझर्व्ह बँकेची फेब्रुवारीमध्ये पतधोरण बैठक होणार आहे. या बैठकीतही रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँक फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात होऊ शकते. जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर तो ५ टक्के होऊ शकतो. दरम्यान, यामुळे होम लोन,कार लोन, पर्सनलचा ईएमआय स्वस्त होऊ शकतो.

रिपोर्टनुसार, आरबीआयची एमपीसी बैठक ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होण्याची शक्यता आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सध्या महागाई जास्त प्रमाणात वाढत नाहीये. अनुकूल चलनवाढ आणि कमी किमती यामुळे रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेचा निर्णय या दोन गोष्टींवर अवलंबून

रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अजूनही रेपो रेटमध्ये कपात होणार की नाही यावर निर्णय झालेला नाही. दरम्यान हा निर्णय महागाई आणि जीडीपीवर अवलंबून असणार आहे. जर यामध्ये कपात झाली तर रेपो रेटमध्येही कपात होणार आहे. सध्या रेपो रेट ५.२५ टक्के आहे. येत्या काळात हा दर अजून कमी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT