RBI Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate: RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! रेपो रेटमध्ये पुन्हा कपात होणार?

RBI Repo Rate May Unchanged: रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय होऊ शकतो.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत चलनविषयक धोरण समिती रेपो रेट जाहीर करणार आहे. यावेळीदेखील सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रेपो रेटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कपात होत आहे, मात्र यावेळी ही कपात होणार नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.आधीच्या कपातीमुळे झालेल्या परिणामांचे मुल्यांकन करण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल. रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

रेपो रेटमध्ये कपात न होण्याची शक्यता

काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे की, मंदी येऊ शकते. त्यामुळे निर्देशंकानुसार औद्योगिक उत्पादन १- महिन्यांत २.५ पर्यंत घसरले. याचसोबत कर्ज घेण्यामध्येही कपात झाली आहे. य

याबाब एसबीआयचे चीफ इकोनॉमिस्ट सौम्य क्रांती घोष यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये व्याजदर कपात करण्यात काहीही अर्थ नाही. जर आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये महागाई कमी आणि स्थिर राहणार असेल तर मध्यवर्ती बँकांनी वाट पाहू नये. त्यांनी इशारा दिला आहे की, आरबीआयने महागाई तात्पुरती कमी होणार असल्याचे चुकीचे गृहित धरले आहे आणि त्यामुळेच दर कमी न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर महागाई अजून जास्त वेळ कमी राहिली तर अर्थव्यवस्था मंदावत राहील.

आता कपात केल्यास येत्या सणासुदीच्या दिवसांमध्ये मागणी वाढू शकते. जर आता व्याजदरात कपात केली तर लवकरच दिवाळी येईल. सध्या सणांचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात जर व्याजदरात कमात केली तर तर क्रेडिटमध्ये वाढ होते, हे याआधीही समोर आले आहे.

आता कपात केल्यास येत्या सणासुदीच्या दिवसांमध्ये मागणी वाढू शकते. जर आता व्याजदरात कपात केली तर लवकरच दिवाळी येईल. सध्या सणांचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात जर व्याजदरात कमात केली तर तर क्रेडिटमध्ये वाढ होते, हे याआधीही समोर आले आहे.

गेल्या सलग ३ पतधोरण बैठकीत रेपो रेट (Repo Rate) कमी केला आहे. रेपो रेट १०० बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. त्यामुळे आता आरबीआय कदाचित यावेळी रेपो रेटमध्ये कपात न करण्याच्या निर्णय घेईल.

आरबीआयचा रेपो रेट बदलणार का?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावेळी रेपो रेटमध्ये बदल न करण्याची शक्यता आहे.

आरबीआयची पतधोरण बैठक कधी होणार?

आरबीआयची पतधोरण बैठक ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट ठरवते. रेपो रेटच्या आधारावर बँका व्याजदर कमी किंवा जास्त करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plastic Stool: स्टूलमध्ये छोटे छिद्र का असते? डिझाईन समजण्याची करू नका चूक!

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

चिमुरडीच्या डोक्यात अडकलं भांडं, दीड इंचावर फिरत होता मृत्यू

Horoscope: आत्मविश्वास वाढेल मनातील भावना येतील ओठांवर; धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजच तुमचं भविष्य

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

SCROLL FOR NEXT